Home /News /videsh /

एकाच शहरात 21 हजार हॉटस्पॉट, ते देखील FREE! गिनीज बुकमध्ये झाली नोंद

एकाच शहरात 21 हजार हॉटस्पॉट, ते देखील FREE! गिनीज बुकमध्ये झाली नोंद

एकाच शहरात तब्बल 21 हजार (21 thousand free hotspot in the city makes it to new world record) मोफत हॉटस्पॉटची सुविधा पुरवल्याबद्दल शहराची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधअये नोंद झाली आहे.

    मेक्सिको, 11 नोव्हेंबर: एकाच शहरात तब्बल 21 हजार (21 thousand free hotspot in the city makes it to new world record) मोफत हॉटस्पॉटची सुविधा पुरवल्याबद्दल शहराची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधअये नोंद झाली आहे. हा विक्रम नोंदवला (New record in Mexico) गेला आहे मेक्सिको शहरात. जगात मेक्सिको हे असं शहर आहे, जिथं सर्वाधिक मोफत हॉटस्पॉट प्रशासनाकडून पुरवण्यात आले आहेत. या विक्रमासाठी शहराचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. विक्रमी हॉटस्पॉट मेक्सिको शहरात सध्या 21 हजार 500 हॉटस्पॉट उपलब्ध आहेत. शहरातील सुमारे 90 लाख नागरिक या सुविधेचा फायदा घेत आहेत. यातील बहुतांश हॉटस्पॉट हे वाहनांमध्ये लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात शहरात लॉकडाऊन असताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेक्सिकोच्या महापौरांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील प्रत्येक घरात जिथं जिथं मोफत वायफायची गरज असेल, तिथे तो उपलब्ध करून देण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा आणि ऑनलाईन क्लासेस अटेंड करता यावेत, या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. सर्वांसाठी इंटरनेट मेक्सिको शहरात सर्वांसाठी मोफत इंटरनेट या संकल्पनेतून 21 हजार 500 हॉटस्पॉट उभे करण्यात आले. मेक्सिकोच्या महापौर क्लाउडिया शीनबॅम यांना या कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणं जगात सर्वाधिक हॉटस्पॉट असणारं शहर हा विक्रमही मेक्सिकोच्या नावे नोंदवला गेला. हे वाचा- छेडछाडीला विरोध करणाऱ्या पैलवान तरुणीची कोचकडून हत्या, भावालाही घातल्या गोळ्या जगभरात वायफायच्या गंमतीजमती मोफत वायफायची संकल्पना अनेकांनी आपल्या उद्योगाच्या मार्केटिंगसाठीदेखील वापरल्याची उदाहरणं जगभरात दिसली. अमेरिकेतील सॅक्सममध्ये एका थाई रेस्टॉरंटच्या भिंतीवरच वायफायचा नंबर लिहीला होता, जेणेकरून लोकांनी त्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये यावं. तर दुसऱ्या एका हॉटेलमध्ये एक भलंमोठं गणित देण्यात आलं होतं. या गणिताचं उत्तर हाच पासवर्ड होता. त्या निमित्ताने लोक गणित सोडवत सोडवत हॉटेलमधील खाद्यपदार्थ विकत घेत आणि तिथं वेळ घालवत. मात्र मेक्सिकोत यापैकी काहीही घडलं नाही, कारण तिथं सर्वत्र इंटरनेट मोफत होतं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: High speed internet, Mexico

    पुढील बातम्या