मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नरभक्षकानं आईला मारुन मृतदेहाचे हजार तुकडे करत खाल्ले, मिळाली 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

नरभक्षकानं आईला मारुन मृतदेहाचे हजार तुकडे करत खाल्ले, मिळाली 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

या युवकानं आईची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body) एक हजार तुकडे केले. नरभक्षक (Cannibal) तरुणानं आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल एका आठवड्यापर्यंत खाल्ले.

या युवकानं आईची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body) एक हजार तुकडे केले. नरभक्षक (Cannibal) तरुणानं आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल एका आठवड्यापर्यंत खाल्ले.

या युवकानं आईची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body) एक हजार तुकडे केले. नरभक्षक (Cannibal) तरुणानं आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल एका आठवड्यापर्यंत खाल्ले.

  • Published by:  Kiran Pharate

स्पेन 16 जून : जन्मदात्या आईसोबत एका तरुणानं अमानुष कृत्य केलं आहे. या युवकानं आईची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे (Dead Body) एक हजार तुकडे केले. हे तुकडे त्यानं प्लास्टिकच्या जारमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवले. या नरभक्षक (Cannibal) तरुणानं आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल एका आठवड्यापर्यंत खाल्ले. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्यानं वेडा असल्याचं नाटक केलं, मात्र कोर्टात त्याचा पर्दाफाश झाला.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर स्पेनच्या वेन्टसमध्ये राहाणाऱ्या 28 वर्षीय अल्बर्टो सांचेज गोमेज या तरुणाला लोक नरभक्षक म्हणू लागले. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण आपल्या आईसोबत वेन्टसच्या मेड्रिडमध्ये राहात होता. हे प्रकरण 2019 मधील आहे, जेव्हा एका रात्री आईसोबत त्याचं भांडण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागात त्यानं आपल्या आईची गळा आवळून हत्या केली.

अल्बर्टोनं आपल्या आईच्या मृतदेहाचे एक हजारहून अधिक तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्यानं लाकडे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्याराचा वापर केला. यानंतर मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या जारमध्ये बंद करून त्यानं ते फ्रीजमध्ये ठेवले. आरोपीनं आठवडाभरात हे तुकडे शिजवून तर अनेकदा कच्चेही खाल्ले. त्यानं आपल्या कुत्र्यालाही हे तुकडे खाण्यासाठी दिले.

'संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार', सतेज पाटलांचं आंदो

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अल्बर्टोच्या आईच्या एका मैत्रिणीनं ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस या तरुणाच्या घरी पोहोचले असता याठिकाणचं दृश्य पाहून पोलिसही हैराण झाले. महिलेच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले. इतकंच नाही तर बाहेर बेडवर या महिलेचं डोकं, हात आणि हृदय काढून ठेवण्यात आलं होतं. हा व्यक्ती आपल्या कुत्र्यासोबत मिळून आईच्या मृतदेहाचे तुकडे खात होता.

पोलिसांनी 21 फेब्रुवारी 2019 ला अल्बर्टोला अटक केली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. कोर्टानं या आरोपीनं सांगितलं, की त्याला वेगवेगळे आवाज येत होते. हे आवाज त्याला आईची हत्या करण्यास सांगत होते. त्याच्या बचावात तरुणाच्या वकिलांनीही त्याला मनोरुग्ण घोषित केलं. मात्र, हे सिद्ध होऊ शकलं नाही. आरोपीनं असंही म्हटलं, की त्याला काहीही आठवत नाही. त्यानं म्हटलं, की मला माझ्या आईची खूप आठवत येते आणि खूप काळजी वाटते. आईची हत्या आणि तिचं मांस खाल्ल्याचं आपल्या लक्षात नसल्याचं या तरुणानं म्हटलं.

शिवसैनिकच! हाताला सलाईन लावून सेनेचे खासदार धैर्यशील माने आंदोलनात सामील

यादरम्यान पुरावे देणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं, की पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आपल्या आईचा गळा आवळून खून केल्याचं त्यानं मान्य केलं होतं. दोन आठवड्याच्या ट्रायलनंतर न्यायालयानं त्याला हत्या आणि मृतदेहासोबत केलेल्या अमानवीय कृत्यासाठी दोषी ठरवलं. तसंच त्याला 15 वर्ष आणि पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अल्बर्टो पंधरा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर तो आपल्या आईसोबतच राहात होता.

First published:

Tags: Crime news, Murder