मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

'संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार', सतेज पाटलांचं आंदोलनातच निमंत्रण!

'संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार', सतेज पाटलांचं आंदोलनातच निमंत्रण!

Maratha kranti andolan Kolhapur LIVE सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.  '

Maratha kranti andolan Kolhapur LIVE सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. '

Maratha kranti andolan Kolhapur LIVE सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. '

  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 16 जून : 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास सरकार कटीबद्ध आहे. चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, त्यामुळे संभाजीराजे यांनी उद्या मुंबईला यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देतील' असं म्हणत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मराठा मूक आंदोलनातच (Maratha kranti andolan Kolhapur) निमंत्रण दिले आहे.

सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.  'महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझं जाहीर निमंत्रण आहे की, उद्या राजेंनी मुंबईत यावं. उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकार मध्ये चर्चा व्हावी'

'मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय साधण्याची जबाबदारी संभाजीराजेंनी घ्यावी, तसंच संभाजी राजेंनी मांडलेल्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे' असंही सतेज पाटील म्हणाले.

सलाईन लावून धैर्यशील माने आंदोलनात सामील

दरम्यान, तब्येत ठीक नसताना हाताला सलाईन लावली होती, अशाही परिस्थितीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (shiv sena mp dhairyashil mane) आंदोलनात सहभागी झाले.

खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी धैर्यशील माने आपल्या गाडीत सलाईन लावून आंदोलन स्थळी पोहोचले.

पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह

मराठा समाजाचे आंदोलन संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पहिले आंदोलन आहे. माझी तब्येत बरी नसली तरीही  माझी नैतिक जबाबदारी आहे की आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. शाहू महाराजांच्या भूमीत आज लढा दिला जात आहे. मराठा समाजासाठी लढा देण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तरी एकत्र येण्याची गरज आहे, म्हणून मी इथं आलो आहे, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं.

तसंच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण लढा देत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आरक्षणासाठी मागणी केली आहे. आरक्षणासाठी लढा देण्यासाठी लोकसभेतही माझा आवाज बुलंद राहिल, अशी ग्वाहीही माने यांनी दिली.

First published: