जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बापरे! एकाच दिवसात तीन 'नरबळी', अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

बापरे! एकाच दिवसात तीन 'नरबळी', अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

बापरे! एकाच दिवसात तीन 'नरबळी', अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

बापरे! एकाच दिवसात तीन 'नरबळी', अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

देशात आजही अनेक ठिकाणी नरबळीच्या कुप्रथा पाळल्या जातात. आपल्या इच्छापूर्तीसाठी एकाच दिवसात दोन-तीन जणांना मारल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 4 नोव्हेंबर: खुनाच्या घटना आपण रोज ऐकत-वाचत असतो. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव घेते. काहीवेळा पैशांच्या वादातून तर काहीवेळा गुप्तधनाच्या लोभापायी एखाद्या माणसाचा जीव घेतला जातो. पैशांच्या लोभासाठी नरबळी दिल्याचे धक्कादायक प्रकार एकविसाव्या शतकातही घडत आहेत. देशात आजही अनेक ठिकाणी नरबळीच्या कुप्रथा पाळल्या जातात. आपल्या इच्छापूर्तीसाठी एकाच दिवसात दोन-तीन जणांना मारल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. आजच्या सुशिक्षित मानवी समाजाला लाजवेल, अशा या घटना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झारखंड राज्यात घडल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे दुर्गा नवमीसारख्या पवित्र दिवशी या घटना घडल्या. हिंदू धर्मग्रंथानुसार देवीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, त्याचदिवशी काही लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या परिसरात बळी देण्यासाठी माणसांना शोधत होते. त्या दिवशी दोन घटनांत तीन निष्पाप माणसांचा बळी देण्यात आला होता. पहिल्या घटनेत भर दुपारी एकाचा नरबळी- पहिली घटना रांची जिल्ह्यातील तमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दयेली गावात घडली होती. याच गावातील एका तरुणाने हरधन लोहरा नावाच्या गावकऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आपला नवस पूर्ण करण्यासाठी निष्पाप हरधन लोहरा याचा बळी दिल्याची त्याने कबुली दिली होती. या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितलं की, हा तरुण घटनेच्या दिवशी सकाळपासूनच हातात चाकू घेऊन परिसरात फिरत होता. आज कोणाचा तरी बळी द्यावा लागेल, असं तो उघडपणे सांगत होता. विशेष म्हणजे, ज्यांनी ही घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती दिली, त्यांनी आधी पोलिसांना सांगितलं नाही. नाहीतर त्या निष्पाप व्यक्तीचा जीव वाचू शकला असता. आरोपी तरुणाने खुलं आव्हान देऊन भर दुपारी हरधन लोहराचा नरबळी दिला आणि गावकरी पाहत राहिले. नंतर गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत हरधनला रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुर्गा नवमीला नरबळी देण्याचा संकल्प केला होता, असं आरोपीने कबूल केलं होतं. आरोपीला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून धारदार शस्त्रंही जप्त केली होती.  हेही वाचा: आई-वडिलांनीच काढला आपल्या एकुलत्या एक मुलाचा काटा; त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी दुसऱ्या घटनेत माय-लेकाने गमावले प्राण- नरबळीची दुसरी घटना पलामू जिल्ह्यातील नौडिहा बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील शिल्दा खुर्द गावात घडली होती. या ठिकाणी दुर्गानवमीलाच भुताखेतांच्या नावावरून झालेल्या वादात साठ वर्षीय कलावती देवी आणि तिचा 38 वर्षांचा मुलगा प्रभू सिंह यांनी जीव गमावला. गावातीलच दोघांनी कुऱ्हाडीने त्यांना कापून टाकलं. मारेकरी विनोदसिंह आणि बबन सिंह यांनी घटनेनंतर स्वतःहून जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या घटनेनंतर तत्कालीन एसडीपीओ अजय कुमार यांनी सांगितलं होतं की, ही घटना भूत-पिशाच्च, अंधश्रद्धा आणि जमिनीवरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणाचा परिणाम होती. तर घटनास्थळी उपस्थित बहुतांश ग्रामस्थांनी पोलिसांसमोरच मायलेकाची हत्या ही नरबळीची घटना असल्याचं म्हटलं होतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पोलिसांच्या आकडेवारीनुसार, झारखंडमध्ये 2015 ते 2020 या पाच वर्षांच्या दरम्यान तंत्र-मंत्र, भूत-पिशाच्च अशा अंधश्रद्धांतून 200हून अधिक माणसांची हत्या झाली. पोलिसांच्याच आकडेवारीनुसार या पाच वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत साडेचार हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2021 रोजी राज्यातील गुमला जिल्ह्यातील लुटो गावात तीन जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. कुटुंबातील एका महिलेच्या अंगात भूत संचारल्याचा असल्याचा आरोप करत त्या तिघांचा खून करण्यात आला होता. नरबळींशी संबंधित इतर घटना- झारखंडमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी याच जिल्ह्यातील कामदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधश्रद्धेतून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यात आली होती. जरी या सर्व घटनांचा थेट संबंध नरबळीशी नसला तरी, या घटनांच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बहुतेक लोकांच्या मते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या नरबळीशी संबंधित होत्या. मात्र, पोलीस अधिकारी हे दावे फेटाळून लावतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात