लखनऊ 08 जून : सध्या देशभरात लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरू आहे. यादरम्यान लग्नातील अनेक विचित्र किंवा मजेशीर घटना समोर येत राहतात. सध्या असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. यात एक नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवासोबतचं नातं तोडलं (Bride Broke Marriage). नवरीचं असं म्हणणं होतं की नवरदेवाचं वय खूप जास्त आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील चौबेपूर येथील आहे.
लग्नानंतर काहीच तासात नवरदेवाने केला नको तो उद्योग; नवरीने थेट पोलीस ठाण्यात पोहोचवलं
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कादीपुर खुर्द गावातील चौहान वस्तीमध्ये एक लग्न होतं. वाराणसीच्या संकटमोचन परीसरातून गावात वरात पोहोचली आणि नवरी नवरदेवाने हिंदू रितीरीवाजानुसार सात फेरे घेतले. प्रथा आणि परंपरेनुसार हे लग्न पार पडलं.
सोमवारी मात्र जेव्हा पाठवणीची तयारी सुरू झाली तेव्हा नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला. तिचं म्हणणं होतं की नवरदेवाचं वय खूप जास्त आहे. हे प्रकरण चौबेपूर ठाण्यात पोहोचलं. नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या लोकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र नवरीच्या हट्टापुढे काहीच होऊ शकलं नाही आणि हे लग्न मोडलं.
गर्लफ्रेंडसोबत भांडणानंतर तरुणाने आधी फोडलं 40 कोटींचं सामान; मग केलं अजब काम
कादीपूर खुर्द गावात राहणारी राजा बाबू चौहान यांची मुलगी काजल हिचं लग्न साकेत नगर संकटमोचन वाराणसी येथील संजय चौहान नावाच्या व्यक्तीसोबत ठरलं होतं. 5 जून रोजी गावात लग्नाचे सगळे विधी पार पडले. सोमवारी सकाळी पाठवणीच्या वेळी जेव्हा सगळं सामान ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये टाकण्यात आलं तेव्हा अचानक नवरीने नवरदेवासोबत जाण्यास नकार दिला. यावरुन वर आणि वधू दोन्ही पक्षात वाद सुरू झाला आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं.
पोलिसांना दोन्हीकडील लोकांना आपसात बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा सल्ला दिला. बराच वेळ चर्चा सुरू होती मात्र नवरीच्या हट्टापुढे कोणाचं काहीच चाललं नाही. अखेर काही तासांसाठी पती बनलेल्या नवरदेवाला नवरीशिवायच आपली वरात घेऊन घरी परतावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Wedding couple