जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग, पतीची कोर्टात धाव

खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग, पतीची कोर्टात धाव

खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग, पतीची कोर्टात धाव

पुण्यात एका लग्नाची विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका जोडप्याचं लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंधास नकार देत होती. पण तीन महिन्यांनतर महिलेचं बिंग फुटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यात एका लग्नाची विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका जोडप्याचं लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंधास नकार (wife refused to have sex) देत होती. पण तीन महिन्यांनतर महिलेचं बिंग फुटलं आहे. बायकोच्या मोबाइलमधील फोटो पाहिल्यानंतर नवऱ्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. तसेच पत्नीने आपली खरी ओळख (gender identity) लपवून आपल्याला धोका दिल्याचा दावाही नवऱ्याने केला आहे. दुसरीकडे, संबंधित महिलेनं देखील नवऱ्यावर छळाचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? आरोपी 23 वर्षीय युवतीचं ऑगस्ट 2020 मध्ये पुण्यातील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. संबंधित तरुणाचा दुधाचा व्यवसाय आहे, तर युवती गृहीणी आहे. पण लग्न झाल्यानंतर त्याच्या दोघांत सर्व काही ठीक नव्हतं. लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंध करण्यास नेहमी नकार देत होती. पण नवीन घरात आली असल्याने तिला वेळ द्यायला पाहिजे, म्हणून पतीनेही तिला फार काही त्रास दिला नाही. पण लग्नानंतर तीन महिन्यांनी पत्नी माहेरी जावून आल्यानंतर पत्नीचं बिंग फुटलं आहे. तिच्या फोनमधील फोटो आणि चॅटींग वाचून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हेही वाचा- सोलापुरात वाळू माफिया सुसाट; कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ट्रकने चिरडलं बायकोचं सत्य समजल्यानंतर नवऱ्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. नवऱ्याने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार, संबंधित महिला ही समलैंगिक आहेत. तसेच फिर्यादीने महिलेच्या मोबाइलमध्ये अन्य एका तरुणीसोबत शरीरसंबंध करतानाचे फोटो पाहिले आहेत. त्यामुळे पत्नी समलैंगिक असेल तर विवाह कायदेशीर मानता येणार नाही. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी संबंधित तरुणाने कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली आहे. हेही वाचा- पुण्यातील ढोल पथकाला हैदराबादमध्ये ठेवलं डांबून; थरारनाट्यानंतर 60 जणांची सुटका दुसरीकडे, मात्र संबंधित महिलेनं आपला नवरा आणि सासऱ्याच्या मंडळीविरोधात छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पैशांसाठी नवऱ्याने आणि सासरच्या कुटुंबीयांनी आपला छळ केल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या गुन्ह्यात कोर्टाने आरोपी नवऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात