Home /News /crime /

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवले खरे रंग; नवरदेवानं घेतली पोलिसांत धाव

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवले खरे रंग; नवरदेवानं घेतली पोलिसांत धाव

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवी नवरी (Bride) दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. या घटनेमुळे घरात एकच गोंधळ उडाला असून नवरदेवानं पोलीस ठाणं गाठलं आहे.

    लखनऊ 25 जून : लग्नसमारंभानंतर (Marriage Function) घरामध्ये अत्यंत आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण असतं. मात्र, आता एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवी नवरी (Bride) दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. या घटनेमुळे घरात एकच गोंधळ उडाला असून नवरदेवानं पोलीस ठाणं गाठलं आहे. नवरदेवानं पोलिसांत (Police) तक्रार देत नवरीला अटक करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान नवरदेवानं (Groom) असाही आरोप केला आहे, की हे लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीनंदेखील एक लाख रुपये लुटले आहेत. ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? करिश्मा कपूरनं सांगितला अनुभव उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) महोबाच्या भटीपुरा येथील रहिवासी असलेल्या शेलेंद्र कुमार यांनी सांगितलं, की त्याची आई आणि मावशी यांच्यात त्याच्या लग्नाची बातचीत सुरू होती. याच दरम्यान बम्हौरीकलां चरखारी गावातील रहिवासी असलेल्या एका युवकानं एक स्थळ असल्याचं सांगत लग्नाची बातचीत सुरू केली. मुलीकडच्या लोकांची परिस्थिती चांगली नसल्यानं सांगत तुम्हीच लग्नाचा संपूर्ण खर्च करा, असंही त्यानं म्हटलं. यानंतर मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला आणि लगेचच मध्यस्थी करणाऱ्या युवकानं लग्नाच्या खर्चासाठी एक लाख रुपये घेतले. ठरल्याप्रमाणं एका मंदिरात हे लग्न पार पडलं. मात्र, लग्नानंतर सासरी येताच ही नवरी घरात ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. चीनमधील सुरुवातीच्या कोरोना रुग्णांचा डेटा गायब; समोर आली महत्त्वाची माहिती नवरदेवाचं असं म्हणणं आहे, की नवरी गायब होताच मध्यस्थी करणाऱ्या युवकाला याबाबतची माहिती दिली गेली आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. मात्र, मध्यस्थी करणारा युवक आता घरच्यांना फोनवर धमकी देत आहे. पीडित नवरदेवानं म्हटलं, लोकांना लग्नाचं आमिष देत लूट केली जात आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Financial fraud, Marriage

    पुढील बातम्या