Home /News /entertainment /

‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? करिश्मा कपूरनं सांगितला अनुभव

‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? करिश्मा कपूरनं सांगितला अनुभव

आज करिश्माचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं जाणून घेऊया हा किसिंग सीन त्यावेळी कसा शूट करण्यात आला होता?

    मुंबई 24 जून: करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘कुली नंबर वन’, ‘हिरो नंबर वन’, ‘बिवी नंबर वन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे जवळपास एक दशक तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (karisma kapoor movies) आज करिश्मा बॉलिवूडमध्ये कार्यरत नाही, परंतु तरी देखील तिच्या चाहत्यावर्गात जराही कमतरता झालेली नाही. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीच्या करिअरची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी (Raja Hindustani) या चित्रपटामुळं. या चित्रपटात तिनं केलेल्या किसिंग सीनची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. आज करिश्माचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं जाणून घेऊया हा किसिंग सीन त्यावेळी कसा शूट करण्यात आला होता? ‘माझ्या वडिलांना तुरुंगात टाका’; अभिनेत्रीनं जन्मदात्याविरोधात ठोठावला कोर्टाचा दरवाजा करिश्माच्या या किसिंग सीनला जवळपास 25 वर्ष उलटून गेली आहेत. भारतीय सिनेसृष्टीत तो पर्यंत इतका मोठा किसिंग सीन चित्रीत झाला नव्हता. त्यामुळे पडद्यावर जेव्हा हा सीन प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रीया असेल? याबाबत निर्मात्यांच्या मनात शंका होती. हा सीन जवळपास तीन मिनिट शूट केला होता. हा सीन शूट करताना सेटवर मोजकेच लोक होते. शूटिंगपूर्वी करिश्मा प्रचंड घाबरली होती. तिच्या मनात लाज आणि शंका दोन्ही होत्या. परंतु दिग्दर्शकानं तिला केवळ व्यक्तिरेखेचा विचार करण्यास सांगितलं. हा किस करिश्मा नसून चित्रपटातील हिरोईन करत आहे. असा विचार करण्यास सांगितला. अखेर करिश्मानं आमिर खानला किस केलं. त्याकाळात किसिंग सीन करणं सामान्य नव्हतं. त्यामुळं करिश्मा घाबरली होती. करिश्मानं मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. शिल्पा शेट्टीने नाकारली 10 कोटींची ऑफर; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव ‘राजा हिंदुस्तानी’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 25 वर्षांपूर्वी या चित्रपटाने तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याकाळी अनेक प्रेक्षक केवळ किसिंग सीन पाहण्यासाठी दोन दोन – तीन तीन वेळा चित्रपट पाहात होते.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या