जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / चीनमधील सुरुवातीच्या कोरोना रुग्णांचा डेटा गायब; अमेरिकन संशोधकानं शोधली महत्त्वपूर्ण माहिती

चीनमधील सुरुवातीच्या कोरोना रुग्णांचा डेटा गायब; अमेरिकन संशोधकानं शोधली महत्त्वपूर्ण माहिती

चीनमधील सुरुवातीच्या कोरोना रुग्णांचा डेटा गायब; अमेरिकन संशोधकानं शोधली महत्त्वपूर्ण माहिती

कोरोनाची एक लाट (Covid Waves) ओसरताच नवी लाट जगभरात थैमान घालत असल्यानं कोरोनाचा (Coronavirus Spread) प्रसार नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठीच्या प्रयत्नांनाही वेग येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जून : कोरोनाची एक लाट (Covid Waves) ओसरताच नवी लाट जगभरात थैमान घालत असल्यानं कोरोनाचा (Coronavirus Spread) प्रसार नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठीच्या प्रयत्नांनाही वेग येत आहे. आता अमेरिकेच्या जेसी ब्लूम (Jesse Bloom) या संशोधकानं असा दावा केला आहे, की त्यांनी रहस्यमयी प्रकारे गायब झालेल्या वुहानमधील सुरुवातीच्या 241 केसच्या डेटामधील 13 केसचा डेटा मिळवला आहे. जेसी ब्लूम हे अमेरिकेच्या फ्रेड हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये व्हायरस एक्सपर्ट आहेत. जेसी यांचं एक संशोधन नुकतंच प्रकाशित झालं आहे, यात वुहानमधील सुरुवातीच्या 241 केसच्या जिनोम सिक्वेंसचा डाटा डिलीट करण्याबाबत सवाल करण्यात आले आहेत. ब्लूम म्हणाले, की जिनोम सिक्वेंस डिलीट केलं जाणं, संशय आणखीच वाढवतं. असंही असू शकत, की कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला हे जाणून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे. VIDEO : कुठं गेला कोरोना? नवी मुंबई विमानतळ नामांतर आंदोलनाचे ड्रोन शॉट्स सुरुवातीच्या जेनेटिक सिक्वेंसिंगच्या माध्यमातून हे शोधता येऊ शकतं, की कोरोना जनावरांमधून माणसांपर्यंत कसा पोहोचला. आपल्या अभ्यासादरम्यान जेसी ब्लूम यांनी मार्च २०२० चा एक रिसर्च वाचला, यात चीनमधील सुरुवातीच्या 241 जेनेटिक सिक्वेंसबाबतची माहिती देण्यात आली होती. हा डेटा एका स्प्रेडशीटमध्ये वुहान युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांकडून ऑनलाईन डेटाबेसवर अपलोड केला गेला होता. या डेटाबेसला सिक्वेंस रीड आर्काइव असं म्हणतात. हे अमेरिका सरकारची नॅशनल मेडिसन लायब्ररी मॅनेज करते. मात्र, जेव्हा जेसी ब्लूम यांनी हा डेटा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना नो आयटम फाऊंड असं उत्तर मिळालं. म्हणजेच सगळा डेटा गायब केला गेला होता. ब्लूमनं पुन्हा एकदा स्प्रेडशीटची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, असं समजलं की जेनेटिक सिक्वेंसिंगचा डेटा वुहानच्या रेनमिन हॉस्पिटलचे शास्त्रज्ञ आयसी फू यांनी जमा केला होता. आयसी फू आणि त्यांच्या टीमनं चीनच्या 45 नॅजल स्वॅबसोबतच आणखी एक स्टडी केला होता, जो नंतर प्रकाशितही झाला. ब्लूमनं हा स्टडीदेखील वाचला आणि त्याला समजलं, की 45 नॅजल स्वॅब हे गायब झालेल्या 241 जेनेटिक सिक्वेंसचे सोर्स होते. लशीसंदर्भात नवीन नियम? कोरोनातून बरे झालेल्यांना दुसऱ्या डोसची गरज नाही: ICMR ब्लूमनं पुन्हा एकदा या सिक्वेंसचा तपास केला आणि हे त्यांना गूगल क्लाउंडवर काही फाईलमध्ये मिळालं. फाईलमध्ये मिळालेले सिक्वेंस त्याच गायब झालेल्या 241 सिक्वेंसमधील होते. ब्लूमचं असं म्हणणं आहे, की त्यांना तेरा सिक्वेंस मिळाले आहेत. मात्र, अधिक माहितीसाठी त्यांना आणखी सिक्वेंसची गरज पडणार आहे. असं म्हटलं जात आहे, की ब्लूमच्या या संशोधनामुळे कोरोनाचा उगम शोधण्यात मोठी मदत होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात