मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपचा धक्कादायक अंत; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपचा धक्कादायक अंत; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सजंयची पत्नी माधुरी हिचे निधन झाले होते. यानतंर त्याचे कवितासोबत सूत जुळले होते आणि तो कवितासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होता. त्याला पहिली पत्नी माधुरीपासून 18 वर्षाची साक्षी आणि 17 वर्षाचा वैभव, अशी दोन मुले आहेत.

पुढे वाचा ...

नागपूर, 27 मे : प्रत्येक प्रेमकहाणीचा (Love Story) अंत हा आनंददायी असतो, असे नाही. अनेक प्रेम प्रकरणं अयशस्वीही होतात. सध्या लिव्ह इन मध्ये राहण्याचेही प्रकार वाढत आहे. अनेक प्रियकर आणि प्रेयसी लग्न न करता लिव्ह इन मध्ये (Live in Relationship) राहणे पसंत करतात. अशाच एका लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यात भांडण झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं -

प्रियकर आणि प्रेयसी काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होती. मात्र, एका कारणावरुन प्रेयसीने आत्महत्या केली. प्रियकराला ही बाब कळताच त्यानेदेखील आत्महत्येचे (Suicide) पाऊल उचलले. संजय शालिकराम गजभिये (वय 45, रा. छत्रपतीनगर, कामठी) असे मृत प्रियकर तर कविता वानखेडे (वय 35) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. हे दोन्ही जण मागील काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

सजंयची पत्नी माधुरी हिचे निधन झाले होते. यानतंर त्याचे कवितासोबत सूत जुळले होते आणि तो कवितासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होता. त्याला पहिली पत्नी माधुरीपासून 18 वर्षाची साक्षी आणि 17 वर्षाचा वैभव, अशी दोन मुले आहेत. तर कविताचे लग्न हे मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील दिलीप वानखेडे नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. मात्र, दिलीपचे अपघाती निधन झाले. यानंतर ती संजय सोबत राहत होती.

प्रेयसीला केली मारहाण  -

मंगळवारी 24 तारखेला हे दोन्ही जण भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे नातेवाईकांकडे लग्नाला गेले होते. मात्र, यावेळी दोघांमध्ये एका कारणावरुन जोरदार भांडण झाले. प्रियकर संजय याने त्याची प्रेयसी कविताला मारहाणही केली. यामुळे ती आपल्या माहेरी काटोल येथे गेली. तर दुसरीकडे संजय हा कामठीला परत आला. मात्र, तिकडे काटोल येथे एक धक्कादायक घटना घडली. संजय याची प्रेयसी कविता हिने बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास विषारी पावडर खाल्ली.

हेही वाचा - Washim Crime : पत्नीसोबत भांडणाचा राग, वाशिममध्ये निर्दयी बापाचं काळीज पिळवटून टाकणारं कृत्य

तिला सुरुवातीला काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर नागपूरला तिला घेऊन जाण्यात आले. मात्र, नागपूरला तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कविता हिच्या भावाने तिचा प्रियकर संजय याला दिली. यानंतर त्यानेसुद्धा आपल्या घरी फिनाईल घेतले. यानंतर त्याला कामठी येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला.

First published:
top videos

    Tags: Couple, Love story, Nagpur News, Relationship, Suicide