रांची 15 जानेवारी : झारखंडमधील चाईबासा येथे पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने 105 मोबाईल चोरले. या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दुकानात ही चोरी झाली त्या दुकानाचे उद्घाटन महिनाभरापूर्वीच झालं असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच चाईबासा पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून गोण्यांमध्ये लपवून ठेवलेले 97 मोबाईल जप्त करण्यात आले. 105 मोबाईल चोरणारे चारही आरोपी विद्यार्थी शिकत आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. एका फोनवर त्याने जळगाव गाठलं; मुलासोबत आरोपीचं भयानक कांड, जिल्हा हादरला पोलिसांना 13 जानेवारीला सकाळी चाईबासा येथील ताम्बो चौकात असलेल्या एका दुकानात चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली होती. येथून 105 मोबाईल चोरीला गेले होते. चोरलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याचे दुकानदाराने सांगितले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एसडीपीओ दिलीप खलखो यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं. पोलिसांच्या पथकाने 24 तासांत चारही आरोपींना पकडलं. पोलिसांनी सर्वांची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. या घटनेत पकडलेल्या आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्याच्या सहा मित्रांच्या मदतीने दुकानाचं शटर तोडून 105 मोबाईल चोरले. एक मिनिटाचा कॉल आणि 2.8 कोटींचा भुर्दंड; असा अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. यामुळे महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या दुकानात चोरीचा कट रचला गेला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, तर दोघे अल्पवयीन आहेत. तर दोन जण फरार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.