मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एका फोनवर त्याने जळगाव गाठलं; मुलासोबत आरोपीचं भयानक कांड, जिल्हा हादरला

एका फोनवर त्याने जळगाव गाठलं; मुलासोबत आरोपीचं भयानक कांड, जिल्हा हादरला

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला गुड्डू नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा जळगावमध्ये पोहोचला.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला गुड्डू नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा जळगावमध्ये पोहोचला.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला गुड्डू नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा जळगावमध्ये पोहोचला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 15 जानेवारी : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारा जानेवारी रोजीची ही घटना आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुड्डू असं या आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलाला फोन  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. घटना समोर येताच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा वास्तव्याला आहे. त्याला एका मोबाईल क्रमांकावरून गुड्डू नावाच्या अंदाजे 28 वर्षीय तरुणाचा 12 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता फोन आला. आरोपीने या मुलाला जळगाव शहरात बोलवून घेतले.

हेही वाचा : आफताबने श्रद्धाची हाडं करवतीने कापली आणि...; प्रकरणात आणखी नवे धक्कादायक खुलासे

 गुन्हा दाखल  

पीडित मुलगा जळगावमध्ये आला असता आरोपीने त्याला जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. या घटनेनं या मुलाला चांगलाच धक्का बसला. या मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Jalgaon