जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रियकराचं धक्कादायक कृत्य; घरातून पळवून नेत प्रेयसीला विकलं, अखेर 3 वर्षांनी अशी झाली सुटका

प्रियकराचं धक्कादायक कृत्य; घरातून पळवून नेत प्रेयसीला विकलं, अखेर 3 वर्षांनी अशी झाली सुटका

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

सुमारे ३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका तरुणीला एका तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर तिला दिल्लीला नेऊन विकलं

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा 16 एप्रिल : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. यात एका तरुणीला तिच्याच प्रियकराने विकलं (Boyfriend Sell a Girl in Delhi). रौटा बाजार रेड लाईट परिसरात तरुणीसोबत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेची सुटका केली. यासोबतच रेड लाईट एरियाच्या ऑपरेटरलाही अटक करण्यात आली आहे. तुरुंगातील ‘महिले’सोबत संबंध ठेवून गरोदर राहिल्या 2 कैदी? अजब घटनेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीवरून स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचले आणि आरोपीच्या तावडीतून तरुणीची सुटका केली. रेड लाईट एरियातून सुटका झाल्यानंतर तरुणीने आपली वेदनादायक कहाणी पोलिसांना सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या माहितीवरून एसडीपीओ आदित्य कुमार यांनी ट्रेनी डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. बयासी, अमूर आणि रौताचे एसएचओही या टीममध्ये होते. डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांनी सांगितलं की, सुमारे ३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका तरुणीला एका तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर तिला दिल्लीला नेऊन विकलं. यानंतर तिला पणजीपारा येथे आणण्यात आलं आणि तिथून मुलीला रौटा बाजार रेड लाईट येथे नेलं गेलं. तेव्हापासून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचं डीएसपींनी या पीडित मुलीच्या हवाल्याने सांगितलं. घरी कुणीचं नव्हतं आणि घात झाला, भावाने उचलले टोकाचे पाऊन, भाऊ हादरला डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांनी सांगितलं की, पीडितेला दिल्लीहून पणजीपारा रेड लाईट एरियात आणण्यात आलं. त्यानंतर तिला रौटा रेड लाईट एरिया येथे पाठवण्यात आलं. येथे तिच्यावर अत्याचार करून तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी पीडितेनं अनेकदा विनंती केली होती. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा रौटा बाजार परिसरातून तरुणीची सुटका केली. रेड लाईट एरियाची ऑपरेटर तमन्ना हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात