मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घरी कुणीचं नव्हतं आणि घात झाला, भावाने उचलले टोकाचे पाऊन, भाऊ हादरला

घरी कुणीचं नव्हतं आणि घात झाला, भावाने उचलले टोकाचे पाऊन, भाऊ हादरला

 दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

  • Published by:  sachin Salve
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 15 एप्रिल :  जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील कुसुंबा इथं एका 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  किशोर जालमसिंग चौधरी असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर चौधरी हा आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा येथे वास्तव्याला होते. शहरातील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होते. गेल्या पाच महिन्यांपासून ते घरी होते.  दुपारी घरात कुणीही नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. (हैदराबादच्या डगआऊटमध्ये नितीश राणाची दहशत, षटकार ठोकत फोडली फ्रिजची काच) दुपारी दीड वाजेच्या सुमारास लहान भावाची पत्नी ही घरी आल्या तेव्हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या भावासह शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने किशोर चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत. जळगावात विचित्र अपघातात 3 जण गंभीर जखमी दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीजवळ ओव्हरटेक करताना तिहेरी अपघातात रिक्षा चालकासह दुचाकीवरी दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यातील तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकी महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट! IIT ने आधीच दिला होता इशारा; XE नं वाढवलं टेन्शन) तालुक्यातील शिरसोली रोडवरील जैन व्हॅलीसमोरून रिक्षा चालक अय्याज शेख शहानुद्दिन शेख हे रिक्षाने शिरसोलीकडून जळगावकडे जात होते. त्यावेळी त्याच्या रिक्षाच्या मागे दुचाकीने विजय मधूकर चौधरी आणि चेतन रघुनाथ भावसार हे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, रिक्षाच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघे हे रिक्षावर आदळले. त्यामुळे रिक्षा देखील पलटी झाली. या विचित्र अपघातात रिक्षाचालकासह दुचाकीवरी दोघेजण गंभीर जखमी झाले. तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
First published:

पुढील बातम्या