Home /News /crime /

तुरुंगातील 'महिले'सोबत संबंध ठेवून गरोदर राहिल्या 2 कैदी? अजब घटनेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

तुरुंगातील 'महिले'सोबत संबंध ठेवून गरोदर राहिल्या 2 कैदी? अजब घटनेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

तुरुंगातील दुसऱ्या महिला कैद्यासोबत परस्पर संमतीने संबंध ठेवल्याने यातील दोन महिला कैदी गर्भवती झाल्या आहेत. ज्या कैदीसोबत महिलांनी संबंध ठेवले, तो आधी पुरुष होता आणि ऑपरेशननंतर तो महिला झाला आहे

    वॉशिंग्टन 16 एप्रिल : तुरुंगात असलेल्या महिला कैदी गर्भवती राहिल्यास खळबळ उडणं सहाजिक आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये अशाच एका प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. एडना महान सुधारक सुविधा हे न्यू जर्सीमधील एकमेव असं कारागृह आहे, जिथे फक्त महिला कैद्यांना ठेवलं जातं. अशात या जेलमधील दोन कैदी गर्भवती असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे (Female Prisoners get Pregnant in Jail). नाश्ता न दिल्यानं भडकला सासरा; सुनेला दिला भयंकर मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक घटना 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, कारागृहातील दोन महिला कैद्यांच्या गर्भधारणेची माहिती समोर आली आहे. विभागातील परराष्ट्र व्यवहाराच्या कार्यकारी संचालक डॅन स्पेर्झा यांनी सांगितलं की, तुरुंगातील दुसऱ्या महिला कैद्यासोबत परस्पर संमतीने संबंध ठेवल्याने यातील दोन महिला कैदी गर्भवती झाल्या आहेत. ज्या कैदीसोबत महिलांनी संबंध ठेवले, तो आधी पुरुष होता आणि ऑपरेशननंतर तो महिला झाला आहे. स्पेर्झाने गर्भवती असलेल्या महिला कैद्यांची नावे सार्वजनिक करण्यास नकार दिला. ही बाब समोर येताच तपास सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रिपोर्टनुसार, या कारागृहात बंद असलेल्या सर्व महिला कैद्यांपैकी 27 कैदी ट्रान्सजेंडर आहेत. काही महिला कैद्यांनी त्यांचं लिंग बदललं आहे. महत्त्वाचं म्हणजे, 2021 मध्ये न्यू जर्सीने एक धोरण लागू केलं की राज्यातील ट्रान्सजेंडरना त्यांच्या सध्याच्या ओळखीच्या आधारावर तुरुंगात टाकले जाईल. जन्माच्यावेळी असलेल्या लिंगाच्या आधरे त्यांना तुरुंगात ठेवलं जाणार नाही. घरात वाद झाला अन् बापाने घरच्यांवरच केला गोळीबार, ठाण्यातील धक्कादायक घटना हे प्रकरण समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे कसं शक्य झालं हे लोकांना समजलं नाही. त्याचवेळी कारागृह प्रशासन तपासाबाबत फारसं बोलणं टाळत आहे. याप्रकरणी कठोर कारवाईही होऊ शकते, असं मानलं जात आहे. कारण या घटनेने कारागृह कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pregnant woman, Shocking news

    पुढील बातम्या