मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! तरुणानं अमानुष मारहाण करत घेतला लहान भावाचा जीव; फक्त 500 रुपये ठरले कारण

धक्कादायक! तरुणानं अमानुष मारहाण करत घेतला लहान भावाचा जीव; फक्त 500 रुपये ठरले कारण

लहान भावानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीला राग आला. यानंतर आरोपीनं लहान भावाला काठीनं मारण्यास सुरुवात केली.

लहान भावानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीला राग आला. यानंतर आरोपीनं लहान भावाला काठीनं मारण्यास सुरुवात केली.

लहान भावानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीला राग आला. यानंतर आरोपीनं लहान भावाला काठीनं मारण्यास सुरुवात केली.

  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 01 ऑगस्ट : एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका तरुणानं आपल्या लहान भावाल अशी शिक्षा दिली, की यात लहान भावाची मृत्यू झाला आहे. आरोपी लहान भावाकडे 500 रुपयांची मागणी करत होता. जे त्याला काही काळापूर्वी आरोपीनंच दिले होते. मात्र, लहान भावानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीला राग आला. यानंतर आरोपीनं लहान भावाला काठीनं मारण्यास सुरुवात केली. यात त्याला हेदेखील समजलं नाही की त्याच्या लहान भावाचा मृत्यू झाला (Boy Killed his Minor Brother for 500 Rupees) आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) कैमूर येथील आहे.

बलात्कार केलेल्या आरोपीसोबत लग्न करायचंय; पीडितेची कोर्टात धाव, मिळालं हे उत्तर

कैमूर जिल्ह्यातील मोहनिया ठाण्याच्या क्षेत्रातील सोंधी गावात राहणारा रामू मजूरी करतो. त्याच्या लहान भाऊ अल्पवयीन होता. आरोपीनं सांगितलं, की लहान भाऊ काहीही काम करत नव्हता मात्र याचदरम्यान त्याला नशेची सवय झाली. अनेकदा नकार देऊनही तो सुधरला नाही. आरोपीनं सांगितलं, की त्यानं लहान भावाला 500 रुपये दिले होते. आरोपीनं त्याला या पैशांबाबत विचारणा केली असता त्यानं काहीच सांगितलं नाही. यानंतर रामू त्याच्याकडे आपले पैसे परत मागू लागला. मात्र, लहान भावानं पैसे दिले नाहीत. याचाच राग मनात धरून रामूनं लहान भावाला काठीनं मारहाण केली.

दफन केलेला मृतदेह पुन्हा काढून केलं पोस्टमार्टम;गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे खुलासा

घटनेत अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली. पोलिसांनी अल्पवीयन मुलाचा मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, आरोपी असलेल्या मोठ्या भावाला अटक केली आहे. केवळ 500 रुपयांसाठी तरुणानं आपल्या लहान भावाचा जीव घेतला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder news