मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'ज्यानं बलात्कार केला त्याच्यासोबतच लग्न करायचंय'; पीडितेनं घेतली कोर्टात धाव, मिळालं हे उत्तर

'ज्यानं बलात्कार केला त्याच्यासोबतच लग्न करायचंय'; पीडितेनं घेतली कोर्टात धाव, मिळालं हे उत्तर

बलात्कार प्रकरणातील एका पीडितेनं (Rape Victim) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करत आरोपीसोबतच लग्न करण्याची परवानगी मागितली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 01 ऑगस्ट : बलात्कार प्रकरणातील एका पीडितेनं (Rape Victim) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करत आरोपीसोबतच लग्न (Marriage with Man Accused of Raping) करण्याची परवानगी मागितली आहे. हा व्यक्ती सध्या 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. या घटनेच्या वेळी संबंधित तरुणी अल्पवयीन होती आणि आता तिनं एका बाळाला जन्म दिला आहे. या व्यक्तीला जामिनावर बाहेर सोडण्याची विनंती तिनं केली आहे. ही घटना केरळच्या (Kerala) कोट्टियूर येथील आहे. रोबिन वडक्कुमचेरी याला 2019 मध्ये लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत न्यायालयानं दोषी ठरवले होते. मात्र, यानंतर महिलेनं असा दावा केला की दोघांनी आपल्या इच्छेनं शारीरिक संबंध ठेवले होते.

दफन केलेला मृतदेह पुन्हा काढून केलं पोस्टमार्टम;गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे खुलासा

केरळ उच्च न्यायालयानं वडक्कुमचेरी याची एक याचिका फेटाळली आहे, ज्यात त्यानं पीडितेसोबत लग्न करण्यासाठी जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं, की बलात्काराच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती, हे अजूनही लागू आहे. तसंच आरोपीच्या शिक्षेविरोधातील अपील अद्याप प्रलंबित आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम राहिल्यास पक्षकारांना विवाह करण्यास परवानगी देण्याचा अर्थ या विवाहाला न्यायालयीन मंजुरी देणं होईल, असं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.

लग्नघरात येऊन नवरदेवालाच किन्नरांनी नेलं पळवून; शेवटी पोलीस ठाण्यात झाला खुलासा

13 जुलै 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोट्टियूर बलात्कार प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. वडक्कुमचेरी याच्याशिवाय पोलिसांनी तेव्हा दोन डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा लपवण्यासाठी, अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या संपर्कात आल्यानंतरही पोलिसांनी याची माहिती न दिल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पीडितेनं रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता आणि ती त्यांच्या देखरेखीत होती.

First published:

Tags: Rape accussed, Rape on minor