Home /News /crime /

दफन केलेला मृतदेह पुन्हा काढून केलं पोस्टमार्टम; गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे झाला मोठा खुलासा

दफन केलेला मृतदेह पुन्हा काढून केलं पोस्टमार्टम; गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे झाला मोठा खुलासा

मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

    बद्दी (सोलन), 31 जुलै : हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात, पोस्टमॉर्टम हाऊसमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी चूक समोर आली आहे. येथे पोस्टमॉर्टम दरम्यान, मृतदेहाच्या डोक्यात एक छेद करण्यात आला नव्हता, ज्यामुळे मृत तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण उघड होऊ शकले नाही. हत्येचे पुरावे गोळा करण्यासाठी, मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि त्याचे पोस्टमॉर्टम केले, ज्यामध्ये मृतदेहाच्या गळ्यात अडकलेली 315 बोअरची गोळी सापडली. डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी झाडण्यात आली. हिमाचल पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्येचा खुलासा झाल्यानंतर मृतदेह पुन्हा सुपुर्द-ए-खाक केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी दोघांनाही नालागढ न्यायालयात हजर केले आणि त्यांना कोर्टाकडून पाच दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. शनिवारी रात्रीपर्यंत आणखी एका आरोपीलाही अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिसौली कोतवाली परिसरातील लक्ष्मीपूर गावातील अब्दुल कलाम हे सोलन जिल्ह्यातील बरोटीवाला पोलीस स्टेशन परिसरातील बद्दी परिसरात फर्निचर बनवण्याचे काम करायचे. त्याच गावातील हशमत आणि फैजान हे देखील त्याच्यासोबत राहत होते. याशिवाय संग्रामपूरचा शमसुलही त्याच्यासोबत राहत होता. 23 जुलै रोजी अब्दुल कलाम यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. हा अपघात असल्याचे सांगून पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. कुटुंबीयांनी त्याला गावातील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. हे ही वाचा-भगत सिंह यांची भूमिका साकारताना गळफास लागून चिमुरड्याचा तडफडून मृत्यू अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्यानंतर, पोलीस पथकासह, नालागढ परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले, हा अपघात नसून खून होता. या आधारावर पोलिसांनी अब्दुल कलामच्या साथीदारांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दफन केलेला मृतदेह पुन्हा काढण्यात आला पोलिसांनी जिल्हाधिकारी (डीएम) दीपा रंजन यांना पत्र लिहून मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानंतर डीएमने गुरुवारी रात्री परवानगी दिली. शुक्रवारी सकाळी बरोटीवाला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बिसौली पोलिसांच्या मदतीने अब्दुल कलाम यांची कबर खोदली आणि त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मारेकऱ्यांनी डोक्यात घातलेली गोळी मृतदेहाच्या गळ्यातून सापडली आहे. यासंदर्भात, बिसौली कोतवाल ऋषिपाल सिंह यांनी सांगितले की, मृतदेह कबरीतून काढण्यात आला आणि पॅनेलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime branch, Crime news

    पुढील बातम्या