Home /News /crime /

मेळघाटात भोंदूबाबाचे 3 वर्षीय बालकावर अघोरी उपचार, पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर

मेळघाटात भोंदूबाबाचे 3 वर्षीय बालकावर अघोरी उपचार, पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर

या तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर विळ्याने 70 पेक्षा अधिक चटके देण्यात आले आहेत. या बालकावर सध्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अमरावती 04 जून : अशिक्षितपणा व अंधश्रद्धेच्या विळख्यात जखडलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज अनेकदा उपचारांऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत विचित्र उपचार करताना दिसतो. हे लोक निरागस बालकांवर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी डम्मा सारखी अघोरी प्रथा कायम ठेवत असल्याचे दिसून येते. डम्मा म्हणजेच पोटावर लोखंडी सळाखी गरम करुन चटके देणे. अशीच आणखी एक घटना मेळघाटातून समोर आली आहे. यात एका ३ वर्षीय बालकास तांत्रिक, भूमका, ओझाने पोटावर असंख्य चटके (डागण्या) दिले. कोरोनापासून चिमुकल्यांचा बचाव कसा कराल? तज्ज्ञांनी पालकांना सांगितला मार्ग या पद्धतीमुळे प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नसून हा चिमुकला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. कामानिमित्त आई-वडील परतवाडा परिसरात असताना या मुलाला साधारण आजाराने ग्रासले होते, यावेळी त्यांनी धामणगाव येथील खासगी डॉक्टराकडे औषधोपचार केले. मात्र, त्या उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रकृतीत काहीच फरक न पडता वाढल्याने त्यांनी मुलाला थेट भगतबाबाकडे नेले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाच्या मदतीवरून पिंपरीत महापौर vs आयुक्त रंगला वाद या बाबाने उपचार म्हणून अघोरी प्रथेच्या आधारे कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डागण्या देवून पोटाची अक्षरशः चाळणी केली. या तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर विळ्याने 70 पेक्षा अधिक चटके देण्यात आले आहेत. या बालकावर सध्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. प्रकरणाची चौकशी करून लवकरच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे चिखलदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी सांगितलं.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Amravati, Crime news

पुढील बातम्या