गुजरातला जाणाऱ्या गाडीतून कोट्यवधींची रक्कम जप्त; सकाळी नोटा मोजायला सुरुवात केली तर संध्याकाळचं उजाडली

जप्त केलेली रक्कम इतकी मोठी होती की, त्यासाठी बँकेतून पैसे मोजण्याची मशीन मागविण्यात आली.

जप्त केलेली रक्कम इतकी मोठी होती की, त्यासाठी बँकेतून पैसे मोजण्याची मशीन मागविण्यात आली.

  • Share this:
    जयपूर, 23 मे: राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये पोलिसांनी गुजरातला जाणाऱ्या एका कारमधून अनेक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी शनिवारी नॅशनल हायवेवरील 8 क्रमांकावरील मार्गावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4.5 कोटी रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. या काळ्या पैशांसोबत दोन आरोपींनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मोठी रक्कम दिल्लीहून गुजरातला नेण्यात येत होती. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. सोबत असा दावा केला जात आहे की, ही हवाल्याची रक्कम आहे. हे ही वाचा-PPE Kits बाबत सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्यान घेरलं DSP मनोज सवारिया यांनी सांगितलं की, सध्या पैसे जप्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे आरोपींकडून चौकशी केली जात आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार हवाल्याशी संबंधित असल्याचं दिसत आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बँकेतून मागवली मशीन पोलीस ठाण्यात इतकी रक्कम मोजण्यासाठी मशीन नव्हती. त्यामुळे बँकेतून मशीनही मागविण्यात आली आहे. नोट मोजता मोजता सकाळपासून संध्याकाळ झाली. जप्त केलेल्या रुपयांची मोजणी सुरू आहे. याशिवाय पोलीस आरोपींची चौकशीही करीत आहे. बिछीवाडा हा भाग गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर स्थित आहे. नॅशनल हायवे रस्ते मार्ग येथूनच पुढे जातो. येथे नेहमीच तस्करी आणि दोन नंबर माल येथून नेला जातो.
    Published by:Meenal Gangurde
    First published: