Home /News /crime /

घरातील मोठ्या सुनेने सासरच्या मंडळींसाठी केला चहा; एकाचा मृत्यू, 5 जणं रुग्णालयात दाखल

घरातील मोठ्या सुनेने सासरच्या मंडळींसाठी केला चहा; एकाचा मृत्यू, 5 जणं रुग्णालयात दाखल

सुनेने पतीपासून सुटका मिळविण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं.

    लखनऊ, 29 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) बचराइचमध्ये एका सूनेने आपल्या पतीसह सासरच्यांकडून सुटका करून घेण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं आहे. या सुनेने सकाळी सकाळी चहा केला आणि त्यात विष टाकून घरात आलेल्या पाहुण्यांसह सर्वांना दिला. या घटनेनंतर घरातील सर्वांची प्रकृती बिघडली आहे. याशिवाय एका दीड वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दीराने दिलेल्या जबाबानंतर आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेने अन्य तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र प्राथमिक तपासात पतीसह सासरच्या मंडळींकडून सुटका करून घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. हे ही वाचा-भुताने झपाटल्याचं सांगून मांत्रिक शिरला घरात; मुलीला पाहून कुटुंबीय हादरलं काय आहे संपूर्ण प्रकरण? बहराइच येथे राहणाऱ्या पंचम जायस्वालच्या घरात हा प्रकार घडला. एक महिन्यानंतर कालच या घरातील मोठी सून सासरी आली होती. तिने सकाळी सर्वांसाठी चहा तयार केला. चहा पिणाऱ्यांना अजिबातच माहित नव्हतं की, त्यांच्यासोबत असं काही घडेल. आरोपी सून अंकिताचे सासरे, दीर, दीराची मुलगी, नणंद, नंदेचा दीड वर्षांचा मुलगा याची तब्येत बिघडली. यानंतर तातडीने सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये दीड वर्षांचा रुंद्राश याचा मृत्यू झाला आहे. सुनेन चहा तयार केला होता, यानंतर पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. यावेळी आरोपी महिलेने सांगितलं की, पती आणि सासरच्या मंडळींकडून सुटका मिळविण्यासाठी तिने हे कृत्य केलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Tea

    पुढील बातम्या