जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भुताने झपाटल्याचं सांगून मांत्रिक शिरला घरात; दुसऱ्या दिवशी मुलीला पाहून कुटुंबीय सुन्न

भुताने झपाटल्याचं सांगून मांत्रिक शिरला घरात; दुसऱ्या दिवशी मुलीला पाहून कुटुंबीय सुन्न

भुताने झपाटल्याचं सांगून मांत्रिक शिरला घरात; दुसऱ्या दिवशी मुलीला पाहून कुटुंबीय सुन्न

तंत्र-मंत्र केल्यानंतर मांत्रिक तेथून निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी मुलीला पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला..

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 29 ऑगस्ट : बदायूतील उझानी भागात कथित भुताने झपाटल्याचं (Superstition) कारण सांगून एका मांत्रिकाने तरुणी सोबत केलेल्या कृत्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला आहे. जेव्हा हा सर्व प्रकार सुरू होता, तेव्हा सर्वजण शांतपणे उभं राहून सर्व पाहत होते. मात्र शुक्रवारी सकाळी तरुणीला पाहिल्यानंतर सर्वजण सुन्न झाले. त्यानंतर मात्र पोलीस ठाण्यात तक्रार करीत आरोपीला तुरुंगात पाठलं आहे. या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. (tantrik torture the girl clicks saying that she was possessed) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उझानी येथील एका गावात राहणाऱ्या कुटुंबाचं तेथील प्रतिष्ठित मंदिरात येणं-जाणं असतं. त्या मंदिराचा महंत स्वत: मांत्रिक असल्याचं सांगतो. त्याने किलाखेडामध्ये राहणाऱ्या एका महिलेला सांगितलं की, तुमच्या मुलीला भुताने झपाटलं आहे. त्याशिवाय मांत्रिकाने तिला बरं करण्याचं आश्वासनही दिलं. गुरुवारी मांत्रिक त्या कुटुंबाच्या घरी गेला. त्यानंतर त्याने घरातील प्रत्येक सदस्याला एक धागा दिला आणि तो गळ्यात घालण्यात सांगितला. कुटुंबीयांनी सांगितलं की, त्या सर्वांना मांत्रिकाने आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानंतर या मांत्रिकाने भुताला पळविण्यासाठी गरम चिमट्याने तरुणीच्या चेहऱ्यावर चटके दिले. यामुळे तरुणी ओरडत होती. मात्र असं असतानाही कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला नाही. हे ही वाचा- कोल्ड ड्रिंक्स, कूलर आणि पंचपक्वान्न; बलात्काराच्या आरोपीला VVIP ट्रिटमेंट मांत्रिकाने कुटुंबाला घाबरवलं.. सात दिवसांपूर्वी मांत्रिकाने त्या कुटुंबाला घाबरवलं होतं. जर लवकरच यावर उपचार केले नाही तर मुलीला मृत्यू होईल असंही सांगितलं होतं. मुलीसाठी कुटुंबीय हा सर्व प्रकार करायला तयार झाले. त्यांनी पूजेच्या साहित्यासह 500 रुपयेही तांत्रिकाला दिले. मात्र चटके दिल्यामुळे मुलीचा चेहरा खूप भाजला आहे. मुलीचा चेहरा खूप जास्त विद्रुप झाला आहे. दोन वर्षांपासून हा तांत्रिक मंदिरात महंत म्हणून सेवा देत आहे. मंदिर मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणी येत असतात. ठगण्याच्या हेतून तो हे सर्व कृत्य करीत होता. याबाबत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आपल्या मुलीला कथित भुताने झपाटलं आहे, असं त्यांना कधीच वाटलं नाही. मात्र ते मांत्रिकाच्या जाळ्यात अडकले व तो सांगेल तसं करू लागले. सध्या तांत्रिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे, मात्र अद्याप त्याने आपला गुन्हा कबुल केला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात