नेहाल भुरे(भंडारा), 08 डिसेंबर : अखेर भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथील 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागला आहे. अत्याचाराच्या प्रयत्नादरम्यान तोंड दाबल्याने श्रद्धाचा गुदमरुन मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान पुरावा नष्ठ करण्यासाठी तनसाच्या ढिगाऱ्यात जाळल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक केलेल्या आरोपीच्या या गुन्हात कोणताही समावेश नसल्याचे समोर आले आहे.
श्रद्धा ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत निवडणुकीच्या संदर्भात बैठक होणार असल्याने शाळा लवकर सोडण्यात आली होती. यामुळे 28 नोव्हेंबर दिवशी ती शाळेतून आल्यावर आई घरी नसल्याने आईच्या शोधात शेजारी रहात असलेल्या आरोपीच्या घरी आईला शोधायला गेली. आरोपीच्या घरी कुणीच नव्हते त्याने मुलीला घरात नेत संधीचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी आरोपीने श्रद्धाचे तोंड दाबल्याने श्वास गुदमरून तीचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला
यावेळी आरोपीने गडबडीत श्रद्धाचा मृतदेह पोत्यात भरून घरामागील खड्ड्यात मुजवला होता. श्रद्धाचा मृतदेह सापडू नये म्हणून मृतदेह खड्ड्यात टाकून त्यावर काळा कचरा टाकून थिमेट टाकले होते. 28 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनाने श्रद्धाची शोध मोहीम सुरू केली होती. याकरिता श्वान पथक पाचारण करण्यात आले होते शोध मोहीममध्ये श्वान पथक हे अल्पवयीन आरोपीच्या घरासमोर जाऊन थांबत होते, मात्र तपासादरम्यान गावात कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांना मिळत नव्हती.
हे सगळं सुरू असताना 30 नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने संधी साधून श्रद्धाचे प्रेत पोत्यासह खड्ड्यातून काढून हे घरामागील शेत शिवारात असलेल्या तणसीच्या ढिगारात नेऊन जाळले. या घटनेनंतर पोलीसांनी संशयित आरोपिला अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही गुन्हा संबधीचा प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी अधिक तपासाचे चक्र फिरवली. अखेर पोलिसांना तपासादरम्यान मुख्य 16 वर्षीय अल्पवयीन मुख्य आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
हे ही वाचा : 7 वर्षांपासून जिच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता ती तरुणी जिवंत सापडली; संपूर्ण सत्य जाणून सगळेच शॉक
याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधात कलम 302,201 भा द वि व पास्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक केलेल्या आरोपीच्या या गुन्हात कोणताही समावेश नसल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Crime, Crime news, Police, Rape case, Rape news