नागपूर, 6 डिसेंबर : प्रेमाच्या त्रिकोणातून हत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका युवकावर त्याच्या मित्राने साथीदारांच्या मदतीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन ठाण्यांतर्गत ही घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही सगळी मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
साहिल चौधरी असे जखमीचे नाव आहे. तर ओम अंगदकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा यवतमाळ येथील रहिवासी असून नागपूरच्या दोन साथीदारांचा या हल्ल्यात सहभाग आहे. साहिल आणि ओमची जुनी ओळख आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलची यवतमाळ येथील एका युवतीशी मैत्री आहे, ओमची देखील त्या युवतीसोबत जवळीक आहे.
काही दिवसांपूर्वी साहिल युवतीच्या जवळ गेल्याचे ओमच्या लक्षात आले. त्यानंतर साहिलला रस्त्यातून हटविण्याची योजना ओमने आखली. यानुसार, ओमने साहिलला रविवारी त्याच्या घराजवळ येऊन फोन केला आणि तुझा जुना मित्र भेटायला आल्याचं सांगितले. यानंतर मानेवाडा रोडवरील सह्याद्री लोनजवळ भेटीसाठी बोलावले.
हेही वाचा - पत्नी, मुले असतानाही त्या महिलेशी संबंध का ठेवतोस, विचारल्यावर मोठ्या भावासोबतच भयानक कांड
तिथे येताच ओम व त्याच्या दोन साथीदारांनी साहिलवर चाकूने वार करायला सुरुवात केली. साहिल त्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी अजनी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दखल करण्यात आला आहे. प्रेमाच्या त्रिकोणात तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Love, Nagpur News