मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

7 वर्षांपासून जिच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता ती तरुणी जिवंत सापडली; संपूर्ण सत्य जाणून सगळेच शॉक

7 वर्षांपासून जिच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता ती तरुणी जिवंत सापडली; संपूर्ण सत्य जाणून सगळेच शॉक

हातरसमध्ये ७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेली मुलगी जिवंत सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी विष्णू नावाचा तरुण गेल्या 7 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे

हातरसमध्ये ७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेली मुलगी जिवंत सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी विष्णू नावाचा तरुण गेल्या 7 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे

हातरसमध्ये ७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेली मुलगी जिवंत सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी विष्णू नावाचा तरुण गेल्या 7 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 07 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात हातरसमध्ये ७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेली मुलगी जिवंत सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करून खून केल्याप्रकरणी विष्णू नावाचा तरुण गेल्या 7 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 7 वर्षांपूर्वी आग्रा येथे सापडलेला एक अज्ञात मृतदेह आपल्या मुलीचा मृतदेह म्हणून ओळखणाऱ्या वडिलांनीही जिवंत सापडलेली मुलगी आपली मुलगी असल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलीचा जबाब घेऊन तिची डीएनए चाचणी घेण्यासाठी तिला न्यायालयात हजर केलं. दुसरीकडे, तुरुंगात असलेल्या विष्णूची आई आणि कुटुंबीयांनी न्यायासह आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा पोलीस स्टेशनच्या धंथोली गावात राहणारी सुनीता हिने वृंदावनच्या भागवताचार्यासोबत एसएसपीची भेट घेतली होती. गावातील मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी आपल्या निष्पाप मुलाला तुरुंगात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही काळापूर्वी त्यांना ही मुलगी जिवंत असल्याची माहिती मिळाली होती. तिने कोणाशी तरी लग्न केलं असून त्याच्यासोबतच राहात असल्याची माहिती विष्णूच्या कुटुंबीयांना मिळाली.

हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या एसएसपी कलानिधी नैथानी यांनी पोलीस स्टेशनला गांभीर्याने तपास करून सत्य शोधण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलीस ठाण्याने सखोल तपास सुरू केला व सदर तरुणीला जिल्हा हातरस येथून ताब्यात घेतल्यानंतर तिला सोमवारी न्यायालयात हजर केलं

एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला

वृंदावन येथील रहिवासी भागवताचार्य उदय कृष्ण शास्त्री, जे विष्णूला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची आई सुनीता हिला मदत करत आहेत, त्यांनी असा आरोप केली की या तरुणीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. ती तिच्या प्रियकरासह पळून गेली होती आणि हातरस येथील गावात पोहोचली होती. भागवत या गावात पोहोचले आणि त्यांनी या तरुणीचा फोटो तिथे दाखवला. यावेळी गावकऱ्यांनी माहिती दिली की ती सात वर्षांपूर्वीच या गावामध्ये पळून आली होती.

भागवताचार्य उदय कृष्ण शास्त्री यांनी असा प्रश्नही उपस्थित केला आहे की, जर ही मुलगी तीच किशोरवयीन असेल जिचा मृतदेह तिच्या वडिलांनी 7 वर्षांपूर्वी ओळखला होता, तर तो मृतदेह कोणाचा होता? ज्याचं शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून अंतिम संस्कार करण्यात आले.

कहर झाला! लग्नाची तयारी सुरू असतानाच प्रियकरासोबत पळून गेली नवरीची आई

काय आहे प्रकरण -

प्रत्यक्षात १७ फेब्रुवारी २०१५ रोजी गावातील एका शेतकऱ्याने पोलिसांत दिलेल्या बेपत्ता तक्रारीत दहावीत शिकणारी त्यांची मोठी मुलगी बेपत्ता असल्याचे म्हटले होते. तिच्या बेपत्ता होण्यामागे गावातील विधवा सुनीता यांचा एकुलता एक मुलगा विष्णूवर कुटुंबीयांचा संशय होता. अनेक महिने चाललेल्या तपासात पोलिसांना या तरुणाबाबत कोणताही सुगावा लागू शकला नाही. काही काळाने आग्रा येथे एका तरुणीचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावरील कपड्यांच्या आधारे ही आपलीच मुलगी असल्याचं सांगत गोंडा येथील या मुलीच्या कुटुंबीयांनी विष्णूवर तिच्या हत्येचा आरोप लावला.

या प्रकरणात, विष्णूला तुरुंगात पाठवत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 25 सप्टेंबर 2015 रोजी मुलीला फूस लावून, तिचा खून करणे आणि पुरावे लपवल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. तेव्हापासून विष्णू अनेक वर्षे तुरुंगात राहिला. काही वर्षांनी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, मात्र नंतर काही कारणास्तव तारखेला कोर्टात न पोहोचल्याने विष्णूविरुद्ध पुन्हा एकदा वॉरंट जारी करण्यात आलं. पोलिसांनी विष्णूला अटक करून पुन्हा कारागृहात पाठवलं. तेव्हापासून विष्णू तुरुंगात आहे.

First published:

Tags: Crime news, Shocking news