लखनऊ, 30 जुलै : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये शनिवारी दुपारी निराला इस्टेट सोसायटीच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती. ज्यावेळी महिलेने आतमहत्या केली तेव्हा कुटुंबातील दुसरे सदस्य शेजारील खोलीत होते. घरातल्यांना याबबत कळताच त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ही घटना बिसरख भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलाने 11 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव प्रतिभा यादव आहे आणि ती 55 वर्षांची होती. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे. इमारतीच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. सोबतच कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.