नवी दिल्ली 13 जानेवारी : गुन्हेगारीची आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये पाचशे रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे एका भिकाऱ्याने शेजाऱ्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी नीलमबाग पोलिसांनी ६२ वर्षीय छगन परमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कांताबेन चारोलिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी सोनल ही २६ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली होती. सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता छगन हा मुलीला घेऊन जाताना दिसला. दोन्ही कुटुंबं फूटपाथवर राहतात. बुधवारी पोलिसांनी आरोपीकडे मुलीबद्दल चौकशी केली. Pune : पैशासाठी मैत्रीचे नाते विसरला, डोक्यात रॅाड टाकून जागेवरच संपवला चौकशीत छगनने पोलिसांना सांगितलं की, त्याने काही वर्षांपूर्वी मुलीची आई कांताबेन यांना 5 हजार रुपये दिले होते. तिने ४५०० रुपये परत केले, मात्र उर्वरित रक्कम ती देत नव्हती, यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. अशा परिस्थितीत बदला घेण्यासाठी त्याने सोनलचं अपहरण केलं.त्याने मुलीला न्यू बंदर रोडजवळील निर्जनस्थळी नेऊन दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह झुडपात फेकून दिला. बुधवारी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. यूपीमध्ये मुलीने केली वडिलांची हत्या ‘प्रेयसीचं भूत मला सतावतं..’; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील जेवर शहरात ५१ वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. यासोबतच तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, जेवर शहरातील पंचम पटेल यांचा डोक्यावर वार करून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी एका माहितीच्या आधारे जेवर पोलिसांनी मृताच्या मुलीला पकडून हरविंदर नावाच्या तरुणाला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की पटेल आपल्या मुलीला त्या तरुणाला भेटण्यास मनाई करत असे आणि त्यामुळेच त्याला मार्गातून दूर करण्याच्या उद्देशाने दोघांनी त्याची हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.