Home /News /crime /

बंजरग दलाच्या कार्यकर्त्याची चाकुने भोसकून हत्या, चौघांना अटक

बंजरग दलाच्या कार्यकर्त्याची चाकुने भोसकून हत्या, चौघांना अटक

चाकुने भोसकून या 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.

    नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी:  दिल्लीतील मंगोलीपुरी परिसरात काही तरुणांनी मिळून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाची ओळख रिंकू शर्मा अशी पटवण्यात आली आहे. या तरुणांनी घरात घुसून चाकुने भोसकून रिंकू शर्माची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. रिंकू शर्माशी या तरुणांचे आधीपासून वैर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान एकंदरितच या परिस्थितीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिले आहे. मंगोलीपुरीमध्ये राहणारा रिंकू शर्मा पेशाने टेक्निशियन होता. तो पश्चिम विहारमधील एका रुग्णालयामध्ये काम करत होता. त्याच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. रिंकूच्या हत्येमुळे शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मीडिया अहवालानुसार रिंकू बजरंग दलाशी संबंधित होता. या दलाच्या विविध उपक्रमांमध्ये तो सहभागी होत असे. (हे वाचा-बाप शोधतोय तरण्या लेकीच्या आत्महत्येचं कारण; हळदीपूर्वी घडली दुर्घटना) मृत रिंकू शर्माचा भाऊ अंकितने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उशीरा रात्री काहीजण त्यांचा दरवाजा ठोठावत होते. दार उघडताच हे हल्लेखोर जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी रिंकूवर चाकुने वार केला. यानंतर ते त्याठिकाणाहून फरार झाले. रिंकू शर्माला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . (हे वाचा-अमानवीय! रॅगिंग करत मुलाच्या तोंडात टाकली जळती सिगरेट, अन्...) मीडिया अहवालानुसार, रिंकूच्या काही जवळच्या व्यक्तींनी अशी माहिती दिली की, गेल्या महिन्यात त्याने राम मंदिर निर्माणासंदर्भात जागरुकता रॅली काढण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यावेळी परिसरातील काही तरुणांशी रिंकूचा वाद झाला होता पण काही वेळाने ते प्रकरण मिटले देखील होते. बुधवारी रात्री त्याच्या घराजवळच आयोजित एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हल्लेखोर आणि रिंकू यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bajrang dal, Bajrang dal worker murder, Crime, Crime news, Delhi latest news, Girl death, Murder, Murder news

    पुढील बातम्या