Home /News /crime /

बुलडाणा हादरलं, 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

बुलडाणा हादरलं, 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता.

नांदुरा, 25 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील 24 वर्षीय नराधमाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसाच्या हवाली केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, स्टेशन रोड परिसरात राहणारी तीन वर्षीय चिमुरडी अंगणात खेळत होती. तेव्हा  नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी (वय 24 राहणार नांदुरा) याने सदर मुलीला कडेवर उचलून नेऊन पंचायत समिती आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील ओसाड व झाडा झुडपांनी गजबजलेल्या निवांत जागी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करत होता. चिकण बिर्याणीवरून वाद! डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची केली निर्घृण हत्या दरम्यान, पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्यात अंगातील कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. 17 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या, विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह यावेळी काही तरुणांनी त्या नराधमाचा शोध घेऊन त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. नैनेश रामचंदानी  या नराधमावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट, खुनाचा प्रयत्न करणे आणि पोक्सो कायद्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Rape

पुढील बातम्या