पुणे, 25 जुलै : खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणाजवळील थोपटेवाडी येथे 17 वर्षीय तरुणीच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशीरा समोर आली आहे. मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला असून हत्येचे कारण अस्पष्ट आहे.
आरती सोपान कलवडे (वय 17) असं निघृण हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर या प्रकरणी नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून 4 संशयितांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भामा आसखेड परिसरातील थोपटेवाडी येथे आरती या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने चाकण पोलीस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्नालयात पाठविण्यात आला आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट असून नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे संशयितांची नावे देण्यात आली आहेत. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - मोठ्या भावाने छातीत सुरा भोसकून केली लहान भावाची हत्या, खुनाचं कारण आलं समोर
कोरोनाच्या महामारीचे संकट असताना खेड तालुक्यातील ग्रामीण भागात तरुणीची निघृण हत्या करुन मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. ही हत्या कोणी आणि का केली, याचा तपास चाकण पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime