मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Fake Website Online Fraud : आलिशान हॉटेलचे फोटो दाखवले, महाराष्ट्रातील 2 भामट्यांनी गुजरातमधील 20 जणांना लाखोंना लुटले

Fake Website Online Fraud : आलिशान हॉटेलचे फोटो दाखवले, महाराष्ट्रातील 2 भामट्यांनी गुजरातमधील 20 जणांना लाखोंना लुटले

हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून तरुणीला लाखोंचा गडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून तरुणीला लाखोंचा गडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून तरुणीला लाखोंचा गडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  विजय वंजारा, प्रतिनिधी

  मुंबई, 7 फेब्रुवारी : राज्यात आर्थिक फसणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईत हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली डुप्लिकेट वेबसाईट तयार करून लाखोंची फसवणूक केल्याच्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

  याप्रकरणातील एका आरोपीला दहिसर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने अटक केली आहे. हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून हे दोन्ही भाऊ रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन लोकांची फसवणूक करायचे. या दोन भावांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील डझनभर लोकांना लाखोंची फसवणूक केली आहे.

  काय आहे संपूर्ण प्रकरण -

  एका फॅशन डिझायनरने दहिसर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर दहिसर सायबर पोलिसांनी तपास करत एका आरोपीला घाटकोपर पूर्व येथून अटक केली आहे. आकाश रूपकुमार जाधव (23) याला अटक करण्यात आली आहे तर अविनाश जाधव (21) हा आरोपी फरार आहे. पोलिसांनी पकडण्यात आलेल्या आरोपीकडून मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.

  एका फॅशन डियायनरने तिचा 31 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेबसाइटचा वापर केला होता. तसेच विस्तारा स्टे रिसॉर्ट बुक केले. वेबसाईटवर नवीन वर्षात आकर्षक ऑफर्सचे आमिष देण्यात आले होते. हे पाहून डिझायनरने 3 दिवसांसाठी रिसॉर्ट बुक करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये ऑनलाइन जमा केले होते.

  28 डिसेंबर रोजी फिर्यादीने रिसॉर्टच्या जेवणाच्या मेन्यूबाबत विचारणा केली असता आरोपी सागर जाधव याने सांगितले की, आमच्या रिसॉर्टमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने रिसॉर्ट बंद केले आहे. त्यामुळे बुकिंगचे पैसे तो परत करणार आहे. पण या गोष्टीला महिना उलटूनही पैसे परत न झाल्याने फॅशन डिझायनरने पोलिसात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

  हेही वाचा - Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत

  तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी आकाश जाधव याला घाटकोपर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचा दुसरा खरा भाऊ अविनाश जाधव (21) याचाही समावेश असून, त्याच्यावर 17 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

  सायबर अधिकारी अंकुश दांडगे यांनी सांगितले की, या दोन्ही भावांनी हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाने दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेतले आणि वेगवेगळ्या बहाण्याने लोकांना पैसे परत केले नाहीत. या दोघांनी मिळून 20 हून अधिक लोकांची फसवणूक केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

  First published:

  Tags: Crime news, Money fraud, Mumbai, Online fraud