जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / काचेच्या बॉटलमध्ये फटाके फोडण्यावरून झाला वाद, 2 अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या मानेत खुपसला चाकू

काचेच्या बॉटलमध्ये फटाके फोडण्यावरून झाला वाद, 2 अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या मानेत खुपसला चाकू

एका 13 वर्षीय आकाश शिंदे नावाच्या मुलासोबत वाद झाला होता. त्याने त्याला फटाके फोडण्यापासून रोखले.

एका 13 वर्षीय आकाश शिंदे नावाच्या मुलासोबत वाद झाला होता. त्याने त्याला फटाके फोडण्यापासून रोखले.

सुनील आणि त्याचे मित्र हे एका काचेच्या बॉटलमध्ये रॉकेट आणि इतर फटाके फोडत होता. पण, तिथे उपस्थितीत असलेल्या मुलांसोबत वाद झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यावरून वाद झाल्यामुळे परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना मुंबईतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. हा तरुण काचेच्या बॉटलमध्ये बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीमधील इमारत क्रमांक 15 बी मध्ये ही घटना घडली आहे. सुनील नायडू (वय 19) असं मृत तरुणाचं नाव आहे. या इमारतीजवळ काही तरुण फटाके फोडत होते. यामध्ये सुनील नायडूचा सुद्धा समावेश होता. (फटाके फोडताना चिमुरड्यासोबत भयानक प्रकार, पाहा, पुण्यातला VIDEO) सुनील आणि त्याचे मित्र हे एका काचेच्या बॉटलमध्ये रॉकेट आणि इतर फटाके फोडत होता. पण, तिथे उपस्थितीत असलेल्या एका 13 वर्षीय आकाश शिंदे नावाच्या मुलासोबत वाद झाला होता. त्याने त्याला फटाके फोडण्यापासून रोखले. पण, दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. पण, त्याच वेळी आकाश शिंदे यांचा 14 वर्षांचा भाऊ तिथेच उभा होता. त्याने रागाच्या भरात सुनीलच्या मानेवर चाकूने वार केला. त्यामुळे सुनीलला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तो घराकडे पळत सुटला. (एकमेकांकडे पाहण्यावरुन झालं भांडण, मुंबईत तिघांचे तरुणासोबत भयानक कांड) त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुनीलच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. फटाक्यांसोबत मस्ती, एकमेकांच्या अंगावर फेकले फटाके दरम्यान, औरंगाबादमध्ये तरुणांच्या टोक्यांकडून एकमेकांच्या अंगावर फेकून फटाके फोडण्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात

औरंगाबाद जिल्ह्यातील खामगाव येथे मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटात तुफान फटाकेबाजीचा स्टंट पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये फटाके फोडणारे तरुण एकमेकांच्या अंगावर फटाके फेकताना पाहायला मिळतात. तर मुलांनी केलेल्या स्टंटबाजीच्या ठिकाणावरून उडद बाजार पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांना माहिती लागतच पोलिस येण्याच्या अगोदर या तरुणांनी पळ काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात