जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 2 हजार वर्षांपासून जमिनीत गाडलं गेलेलं धक्कादायक रहस्य; खोदकामामुळे झाला खुलासा

2 हजार वर्षांपासून जमिनीत गाडलं गेलेलं धक्कादायक रहस्य; खोदकामामुळे झाला खुलासा

2 हजार वर्षांपासून जमिनीत गाडलं गेलेलं धक्कादायक रहस्य; खोदकामामुळे झाला खुलासा

हे कब्रिस्तान 2 फेब्रुवारी 2019 रोजी पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाला सापडलं. या सर्व ममी 2 हजार वर्षे जुन्या असल्याचं बोललं जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 फेब्रुवारी : मृतदेह पाहून कोणताही सामान्य माणूस नक्कीच घाबरेल. अशात खोदकाम करताना तुम्हाला एकसोबतच 50 मृतदेह आढळले तर? सध्या अशीच एक घटना इजिप्तमध्ये घडली. इथे काही पुरातत्वशास्त्रज्ञ इतिहासाच्या खोलात जाण्यासाठी खोदकाम करत होते. मात्र यादरम्यान असं एक रहस्य समोर आलं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे पुरातत्वशास्त्रज्ञ ममीचा शोध घेत होते, पण त्यांना कल्पनाही नव्हती की आपल्याला एक मोठं कौटुंबीक कब्रिस्तानच मिळेल, जिथे एकसोबतच 50 मृतदेह असतील (50 Mummies Found). एवढा मोठा बदल? तालिबानी सैनिक दिसणार बंदुकीविना, कारण आहे गंभीर हे कब्रिस्तान 2 फेब्रुवारी 2019 रोजी पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाला सापडलं. या सर्व ममी 2 हजार वर्षे जुन्या असल्याचं बोललं जात आहे. इजिप्तची राजधानी कैरोपासून 211 मैलांवर असलेल्या टुना एल गालेब येथे हे कब्रिस्तान सापडलं. आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की केवळ मोठ्या माणसांचे मृतदेहच ममीमध्ये असतात. मात्र यात 12 मुलांच्या ममी सापडल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे (50 Mummies of Same Family). मात्र, या ममींची अद्याप ओळख पटलेली नाही. हे कब्रिस्तान पाहून सर्व पुरातत्वशास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आणि ते सहाजिकही आहे. एकाच कुटुंबातील 50 लोकांच्या ममी एकसोबतच आढळणं सामान्य गोष्ट नाही. सहसा असं होत नाही. पण इथे एकाच कुटुंबातील पन्नास लोकांच्या ममी सापडल्या, त्यापैकी 12 मुलांच्या ममी होत्या. हा शोध खास देखील आहे कारण या माध्यमातून मृतदेहांना ममी बनवण्याची पद्धतही समोर येणार आहे.

इस्त्रायलकडून पॅलेस्टिनींचा वर्णद्वेष आणि अमानुष अत्याचार, Amnesty चा रिपोर्ट

या सर्व ममी एकाच कुटुंबातील असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून समोर आलं आहे. हे कुटुंब उच्च मध्यमवर्गीय होतं. असं मानलं जातं की हे घराणं टॉलेमसच्या काळातील आहे. म्हणजेच, सुमारे 305 BC च्या सुरूवातीस या कुटुंबाला ममीफाईड केलं गेलं. इजिप्त पुरातन वस्तूंच्या सर्वोच्च परिषदेच्या महासचिवांच्या मते, ममीच्या कोणत्याही थडग्यावर नाव लिहिलेलं नव्हतं. मात्र ते दोन हजार वर्षे जुने आहेत हे निश्चित.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात