Home /News /videsh /

इस्त्रायलकडून पॅलेस्टिनींचा वर्णद्वेष आणि अमानुष अत्याचार, Amnesty च्या रिपोर्टनंतर जगभरात खळबळ

इस्त्रायलकडून पॅलेस्टिनींचा वर्णद्वेष आणि अमानुष अत्याचार, Amnesty च्या रिपोर्टनंतर जगभरात खळबळ

इस्रायलनं मानवतेचं उल्लंघन करून पॅलेस्टिनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार केल्याचं ऍमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

    जेरुसलेम, 1 फेब्रुवारी: इस्त्रायलकडून (Israel) पॅलेस्टिनी (Palestine) नागरिकांवर अनन्वित अत्याचार (Apartheid) करण्यात आले आणि त्यांना वर्णद्वेषी वागणूक देण्यात आली, असं ऍमनेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International) या संस्थेच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. जगातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या इस्त्रायल पॅलेस्टाईन वादाची एक नवी बाजू या रिपोर्टमुळे समोर आली असून कशा प्रकारे इस्रायलमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना अमानुष वागणूक देण्यात आली, याचे तपशील या रिपोर्टमधून देण्यात आले आहेत.  पॅलेस्टिनी नागरिकांचा छळ लंडनमधील ऍमनेस्टी ग्रुपनं इस्त्रायलव्याप्त पॅलेस्टिनी भागात सर्वेक्षण करून हा रिपोर्ट तयार केला आहे. 211 पानी या रिपोर्टमध्ये इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर अमानूष अत्याचार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. इस्रायलकडून पॅलेस्टिनी भूमीवर करण्यात आलेलं अतिक्रमण, पॅलेस्टिनी नागरिकांच्या मालमत्तेवर इस्रायलकडून मारण्यात आलेला डल्ला, अनेक पॅलेस्टिनी नागरिकांच्या निर्घृण हत्या, नागरिकांचं त्यांच्या मर्जीविरोधात करण्यात आलेलं स्थलांतर आणि त्यांना नागरिकत्व देण्यास सातत्यानं मिळणारे नकार असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे इस्रायलकडून करण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.  इस्राईलकडून पलटवार केवळ एका वर्षाच्या निरीक्षणाच्या आधारे ऍमनेस्टी इंटरनॅशनलकडून करण्यात आलेले हे दावे इस्त्रायलची बदनामी करण्यासाठी केले जात असल्याचा दावा इस्रायल सरकारनं केला आहे. इस्रायलबाबत जगातील इतर देशांचं मत कलुषित करण्यासाठी जाणीवपूर्वक युकेच्या ऍमेनेेस्टी इंटरनॅशनल संस्थेकडून असे गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे.  हे वाचा - पॅलेस्टाईनकडून स्वागत पॅलेस्टाईन साहजिकच या रिपोर्टचं स्वागत केलं असून या रिपोर्टमधून सत्य परिस्थिती जगासमोर आल्याचं म्हटलं आहे. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येत असल्याचा दावा ऍमनेस्टीच्या रिपोर्टमधून करण्यात आला असून ग्राउंड रिपोर्टिंग आणि तथ्यांच्या आधारावरच ही निरीक्षणं नोंदवण्यात आल्याची संस्थेनं म्हटलं आहे.  मानवतेवर हल्ला इस्रायलनं पॅलेस्टिनी नागरिकांवर चालवलेले अत्याचार हे केवळ विस्तारवादाच्या नजरेतून बघता येणार नाहीत, तर मानवतेच्या सर्व निकषांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Israel, Palestinian

    पुढील बातम्या