जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / एवढा मोठा बदल? तालिबानी सैनिक दिसणार बंदुकीविना, कारण आहे गंभीर

एवढा मोठा बदल? तालिबानी सैनिक दिसणार बंदुकीविना, कारण आहे गंभीर

एवढा मोठा बदल? तालिबानी सैनिक दिसणार बंदुकीविना, कारण आहे गंभीर

तालिबान आणि बंदूक यांचं नातं गेल्या दोन वर्षात फारच घट्ट झालं आहे. मात्र आता हे नातं तोडायला सरकारनं सुरूवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबुल, 2 फेब्रुवारी: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) वेगवेगळ्या मनोरंजन उद्यानांमध्ये (Amusement parks) जाताना तालिबानी सैनिकांनी (Talibani Fighters) आपल्यासोबत बंदुका (Guns) नेऊ नयेत, असे आदेश तालिबान सरकारनं (Taliban Government) दिले आहेत. तालिबान आणि बंदूक हे समीकरण गेल्या वीस वर्षांत पूर्ण जगाच्या नजरेत पक्कं बसलं आहे. मात्र आता यापुढे बंदुका न घेतलेले तालिबानी सैनिक अफगाणी नागरिकांना दिसणार आहेत. तालिबान सरकारनं अधिकृत आदेश काढून सर्व फायटर्सना याची सूचना दिली आहे. काय आहे सूचना? गेल्या 20 वर्षांपासून अमेेरिकी सैन्याविरुद्ध लढा देणाऱ्या तालिबानचं बंदुकीशी वर्षानुवर्षांचं नातं तयार झालं आहे. तालिबानी सैनिकाची बंदुकीशिवाय कुणी कल्पनाही करू शकणार नाही, असं चित्र दोन दशकांत तयार झालं आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात तालिबानी सैनिक हातात बंदुका घेऊन स्वैर संचार करत असल्याचं चित्र दिसत होतं. काही ठिकाणी अफगाणिस्तानमधील अमेरिका पुरस्कृत सरकारच्या सुरक्षा रक्षकांसोबत त्यांचा सामनाही होत होता. मात्र आता तालिबाननं पूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता प्रस्थापित केली असून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.   प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न देशातील वेगवेगळी उद्यानं आणि बागा या ठिकाणी नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी जाताना तालिबानी फायटर्सनी बंदुका घेऊन जाऊ नयेत, असे आदेश तालिबान सरकारनं जारी केले आहेत. देशातील जनतेच्या नजरेत आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न तालिबान करत असल्याचं चित्र आहे. मुलींच्या शिक्षणाला परवानगी देणं असो किंवा उद्यानांमध्ये सैनिकांना बंदुका न नेऊ देण्याचा आदेश असो, तालिबान सौम्य होत असल्याचं चित्र आहे.   हे वाचा -

जागतिक प्रतिमा सुधारण्यासाठी… तालिबानला जगातील अनेक प्रगत देशांनी मान्यता दिलेली नाही. याचा परिणाम अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा सुधारणे आणि देशाचा अर्थगाडा रुळावर आणणे या उद्देशानंच तालिबान आपलं मूळ रौद्र रूप टाकून सौम्य रुप धारण करत असल्याचं राजकीय अभ्यासकांचं निरीक्षण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात