मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिर्डीतील शिक्षकाचं शाळकरी मुलींसोबत गैरकृत्य, प्रकार उघडकीस येताच पालकांनी दिला चोप

शिर्डीतील शिक्षकाचं शाळकरी मुलींसोबत गैरकृत्य, प्रकार उघडकीस येताच पालकांनी दिला चोप

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुरू शिष्याच्या नात्याला शिर्डीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाने काळीमा फासला आहे.

अहमदनगर, 19 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यानंतर आता शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा लावणारा प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. साईबाबांच्या शिर्डी नगरीत जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. काय आहे संपूर्ण प्रकरण -  शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिला आहे. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरू शिष्याच्या नात्याला शिर्डीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकाने काळीमा फासला आहे. सहावी, सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच त्यांच्याशी अश्लील चाळे केले. या संतापजनक प्रकारानंतर संजय थोरात या शिक्षकाला आज पालकांनी चोप दिला आहे. सातत्याने लहान मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या या शिक्षकाबद्दल मुलीने जेव्हा आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेले महिला पुरूष थेट शाळेत पोहोचले आणि या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. शिक्षकावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. हेही वाचा - ‘चंद्रा’ फेम जयेश खरेची हृदयस्पर्शी कहाणी; वडील ऑर्केस्ट्रामध्ये राबतात, मुलासाठी मोठं स्वप्न मागच्या महिन्यात अमरावतीमध्येही घडली विचित्र घटना -  एका शिक्षकाने विद्यादानाचे कार्य सोडून विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्याचे सांगितले. तसेच दारू पिऊन खुर्चीवर झोपला आणि दारुछ्या नशेत तिथेच लघूशंका केली. मागच्या महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा काकरमल येथे हा धक्कादायक प्रकार घडला होता. येथील शिक्षक पृथ्वीराज नेत्रराम चव्हाण (वय 38) याने दुपारी शाळेत हजर विद्यार्थ्यांना शाळेला सुटी झाल्याचे सांगितले. यानंतर मस्त दारू पिऊन खुर्चीवर झोपून गेला व तिथेच लघुशंका केली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून आणले. यानंतर पालकांनी या शिक्षकाचा समाचार घेतला. याप्रकरणी या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पालकांनी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.
First published:

Tags: Crime news, Sexual assault, Shirdi

पुढील बातम्या