जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप

Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप

Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh Crime) अन्नमय्या जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. एका सासूने आपल्या सुनेचा शिरच्छेद करून पोलीस ठाणे गाठले.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

अन्नमय्या, 12 ऑगस्ट : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh Crime) अन्नमय्या जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. एका सासूने आपल्या सुनेचा शिरच्छेद करून पोलीस ठाणे गाठले आहे. हातात डोके घेऊन महिलेने पोलीस ठाणे गाठल्याने एकच खळबळ उडाली. अन्नमय्या जिल्ह्यातील रायचोटी परिसरात ही घटना घडली. रामपुरम गावात हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नमय्या जिल्ह्यातील रायचोटी भागात सुब्बम्मा नावाच्या महिलेने आपल्या 35 वर्षीय सून वसुंधरा हिचा शिरच्छेद केला. धडापासून डोके वेगळे करून पॉलिथिनमध्ये भरून ती हातात घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाली. तिला अशा अवस्थेत जाताना पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना पाहून शहरातील लोक ही गोंधळात पडले होते. हे भीषण दृश्य पाहून काही लोक घाबरलेही होते. छिन्नविछिन्न शीर घेऊन ही महिला पोलिस स्टेशनमध्ये पोहोचताच पोलिसही हैराण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :  64 जणांच्या बाईक चोरल्या, सात जिल्ह्यांमधून पळवापळवी, पंढरपुरात सराईत टोळीचा पंचनामा

रायचोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्बम्मा हिने गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास तिची सून वसुंधरा हिचा शिरच्छेद करून तिची हत्या केली. आणि तिचे डोके पोलिस ठाण्यात घेऊन आली. 10 वर्षांपूर्वी वसुंधरासोबत लग्न केल्यानंतर सुब्बम्माच्या मुलाचे निधन झाले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि तंदुरुस्त; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

मृत सून वसुंधरा हिचे मल्लिकार्जुन नावाच्या तरुणासोबत अनैतीक संबंध असल्याचा सुब्बाम्माला संशय होता. सून वसुंधरा आणि मल्लिकार्जुन यांना संपत्तीसाठी सुब्बम्माची हत्या करायची होती. या भीतीपोटी सुब्बम्माने सून वसुंधराची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात