सोलापूर, 11 ऑगस्ट : सोलापुरात दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत टोळीला जेरबंद करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलीस या टोळीचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते. अखेर या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी एक किवा दोन नाही तर तब्बल आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींच्या तापासात खूप महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींनी गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून तब्बल 64 दुचाकी चोरी केल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत ही तब्बल 21 लाख 30 हजार रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडे चोरी झालेल्या 64 दुचाकी मिळाल्या आहेत. सर्व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी आरोपींनी आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी आरोपींना कसं शोधून काढलं? पंढरपूर शहर आणि परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना समोर येत होत्या. दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलीसही हैराण झाले होते. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी तीन पथकांची नियुक्ती केली. या पथकांकडून सातत्याने तपास सुरु होता. अखेर या पथकाला दुचारी चोरांच्या कूकृत्यांची खबर लागली. त्यातून पथकाने सापळा रचला आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी ठरला. ( पत्नीने घरातच दफन केला पतीचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्यानंतर दिलं विचित्र कारण ) खरंतर पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने टाकळी बाह्यवळण येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. आरोपी खरोखरच संबंधित ठिकाणी चोरीची दुचाकी विकण्यासाठी आले होते. ते आले तेव्हा पोलिसांना त्याची खात्री पटली आणि त्यांनी आरोपींना लगेच ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण साथीदारांच्या मदतीने फक्त पंढरपूरच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक दुचारी चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी आपण साथीदारांच्या मदतीने पंढरपूर शहर आणि परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीच्या माहितीच्या आधारावर त्याच्या इतर सहऱ्यांनादेखील बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी आरोपींकडून सोलापूर जिल्ह्यातील 26, सांगलीतील 15, साताऱ्यातील 5, कोल्हापूरातील 4, पुण्यातील 5, अहमदनगरमधील 1, बीडमधील 5 आणि माहिती उपलब्ध नसलेल्या 6 अशा 64 दुचाकी हस्तगत केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.