मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि तंदुरुस्त; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि तंदुरुस्त; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

कोणत्याही वयात योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे. पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. वयाच्या 50 नंतर आहार इतर गोष्टींची काळजी कशी घ्यावी, याविषयी जाणून घेऊया.

कोणत्याही वयात योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे. पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. वयाच्या 50 नंतर आहार इतर गोष्टींची काळजी कशी घ्यावी, याविषयी जाणून घेऊया.

कोणत्याही वयात योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे. पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. वयाच्या 50 नंतर आहार इतर गोष्टींची काळजी कशी घ्यावी, याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने आपले शरीर कमजोर होऊ शकते. त्यामुळे आहारात फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश असावा. व्यायाम तर हवाच पण त्याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी करण्याची गरज असते. त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि आपण अ‌ॅक्टीवही राहतो. या गोष्टींचा आहारात समावेश करा 1. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खा - कोणत्याही वयात योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्नायूंचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि पेशींची जलद दुरुस्ती करण्यासाठी आपण आहारात प्रथिनांचा समावेश करावा. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि स्नायू दुखू शकतात. प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये डाळी, मासे, चिकन आणि कॉटेज चीज यांचा समावेश होतो. यामुळे आपण निरोगी राहू शकता. 2. कॅल्शियम समृद्ध गोष्टींचा समावेश करा - वयानुसार आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. यासोबतच हाडांची घनता कमी होऊ लागते. हाडांशी संबंधित अनेक आजारांसाठी आणि मजबुतीसाठी आपण कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करू शकता. विशेषतः स्त्रियांसाठी हे खूप महत्वाचे आहे, कारण रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये हाडांची घनता कमी होऊ लागते किंवा हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी आपण पनीर, टोफू, भाज्या आणि दुधाचे सेवन करू शकता. 3. फायबर समृध्द आहार - वयाच्या 50 व्या वर्षीही फायबरयुक्त आहार घ्यावा, जेणेकरुन अन्नाचे पचन शरीरात सहज होऊन पचनसंस्था मजबूत राहते. फायबरचे सेवन केल्याने आपल्याला अपचन, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही. हे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि आतड्याची हालचाल नीट राहण्यास देखील मदत होते. 4. अँटिऑक्सिडंट्स - अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्याची ताकद मिळते आणि वृद्धापकाळातही आपली त्वचा तरुण राहते. याशिवाय डोळे, हृदयविकार नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर असा व्यायाम करा - जसजसे तुमचे वय वाढत जाईल, तसतसे तुम्हाला खूप जड व्यायाम करण्याची गरज नाही. यामुळे तुमच्या शरीराच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. तुम्हाला शरीरात अशक्तपणाही जाणवू शकतो. याशिवाय काही धोकादायक दुखापत होण्याची भीतीही असते. यासाठी आपण सोपे व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे - 1. चालणे 2. एरोबिक व्यायाम 3. स्ट्रेचिंग करा 4. कोर एक्सरसाईज 5. जॉगिंग हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा टिप्स 1. याशिवाय दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 2. ड्रायफ्रुट भिजवून खा, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील. 3. आहारात अधिकाधिक हिरव्या भाज्या, फळे आणि डाळी घ्या. 4. व्यायाम करताना किंवा वॉकिंग-रनिंग करताना काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या