मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नर्सने चिमुरडीवर कोरोना उपचार केले अन् ढकललं तिला Sex रॅकेटच्या जाळ्यात! 13 वर्षीय मुलीवर 6 महिने Rape; 54 जण अटकेत

नर्सने चिमुरडीवर कोरोना उपचार केले अन् ढकललं तिला Sex रॅकेटच्या जाळ्यात! 13 वर्षीय मुलीवर 6 महिने Rape; 54 जण अटकेत

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर ...

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh Crime News) गुंटूर (Guntur) इथल्या 13 वर्षांच्या मुलीवर सहा महिने अनेक जणांकडून बलात्कार झाल्याचं भयंकर प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे.

    गुंटूर, 04 फेब्रुवारी: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh Crime News) गुंटूर (Guntur Rape Case) इथल्या 13 वर्षांच्या मुलीवर सहा महिने अनेक जणांकडून बलात्कार झाल्याचं भयंकर प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे. कोविडवरील (Covid-19) उपचारांच्या नावाखाली या मुलीला एका नर्सने आपल्या घरी नेलं होतं, नंतर तिच्यावर देह विक्रय करण्याची बळजबरी करण्यात आली. या काळात तीन सेक्स रॅकेटमध्ये या मुलीचा वेश्या व्यवसायासाठी वापर झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी नर्स स्वर्णकुमारीसह 54 जणांना अटक केली आहे. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये कथित दलाल आणि पुरुष ग्राहकांचा समावेश आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    या प्रकरणाची सुरुवात झाली ती गुंटूरमध्ये. आठवीत शिकणाऱ्या या आईविना मुलीला कोविड-19 ची लागण झाल्यानं 26 जून 2021 रोजी गुंटूरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयातील स्वर्ण कुमारी नावाच्या एका महिलेने आपण नर्स असल्याचं सांगत या मुलीच्या वडिलांना विश्वासात घेतलं आणि चांगल्या उपचारांसाठी, देखभालीची हमी देत तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची परवानगी मागितली. मुलीचे वडील मजूरी करतात. त्यानुसार ती नर्स या मुलीला आपल्या घरी घेऊन गेली आणि काही दिवसांनंतर तिनं या मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं.

    हे वाचा-शिकवणीच्या वादातून क्लासचालकानं केली हद्द पार; बंदूक घेऊन केबीनमध्ये शिरला अन्..

    त्या कथित नर्सन या मुलीला नेल्लोर, विजयवाडा, ओंगोल तसंच हैदराबाद अशा ठिकाणी नेलं, तिथं अनेक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या काळात आपली मुलगी नर्सच्या घरी सुरक्षित आहे,असंच या मुलीच्या वडिलांना वाटत होतं. त्यांना खरं कळू नये यासाठी स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे. दरम्यान, दोन महिने हा छळ सोसल्यानंतर या मुलीनं त्या नर्सच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवलं आणि ती विजयवाडा (Vijaywada) इथं पोहोचली. तेव्हा स्वर्ण कुमारीनं मुलीच्या वडिलांना ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली आणि गुंटूरमधील नल्लापाडू पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. तक्रार करूनही ही मुलगी सापडली नाही.

    या मुलीच्या दुर्दैवानं अद्याप तिची पाठ सोडली नव्हती. विजयवाडा इथं बसस्थानकावर घाबरून एकटीच बसलेल्या या मुलीला वेश्या व्यवसायातील दलाली करणाऱ्या एका महिलेनं हेरलं आणि गोड बोलून ती तिला आपल्या घरी घेऊन गेली. या महिलेनं ही काकिनाडा, तनुकू अशा अनेक ठिकाणी नेऊन अनेक पुरुषांशी तिचा सौदा केला. या मुलीला वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनं एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जात असताना जससिंथा आणि तिची मुलगी हेमलता या मायलेकींच्या जोडीच्या संपर्कात ही मुलगी आली. तिला मदत करण्याच्या बहाण्यानं या दोघींनी तिच्याकडून सगळी माहिती गोळा केली आणि तिचा सौदा करणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

    हे वाचा-मसाज पार्लरच्या नावाखाली SEX रॅकेट! तरुणींना इंजेक्शन देऊन सुरू होतं काळं कृत्य

    या मुलीला कायमस्वरूपी देहविक्रय करण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने ही जोडी मुलीच्या शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) मिळविण्यासाठी गेली. जेणेकरून या मुलीला त्या आपल्याजवळ ठेवू शकतील. मात्र शाळा व्यवस्थापनाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. तेव्हा या दोघीनी मुलीच्या वडिलांकडे जाऊन त्यांना त्यांच्या मुलीची अवस्था सांगितली. मुलीच्या वडिलांना आपली ओळख बाल कल्याण विभागातील अधिकारी म्हणून करून देत या दोघींनी वडिलांनीच मुलीला देह विक्रय करण्यास भाग पाडल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा घाबरलेल्या वडिलांनी मुलीच्या शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि ते त्यांच्या हवाली केलं.

    त्यानंतर या मायलेकी अनेक पुरुषांबरोबर या मुलीचा सौदा करू लागल्या. त्यानंतर या मुलीनं दोन दिवसात त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यश मिळवलं आणि 18 डिसेंबर 2021 रोजी ती आपल्या घरी पोहोचली. तिनं आपल्या वडिलांना सर्व कहाणी सांगितली. तेव्हा त्यांनी मेडिकोंडुरू पोलिसांशी संपर्क साधला. 18 डिसेंबर रोजीच पोलिसांनी शून्य एफआयआर (Zero FIR) दाखल केला आणि हे प्रकरण तपासासाठी अरुंदलपेट पोलिसांकडे हस्तांतरित केलं.

    हे वाचा-पैशांपुढे मैत्री हरली! नांदेडात तरुणाने मित्राला दिला भयंकर मृत्यू, थरारक घटना

    दरम्यान, या मुलीला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुंटूर शहर पोलिसांनी (Guntur Urban Police) या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत, तपासासाठी विशेष पथकं तयार केली आणि 54 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसंच अवैध तस्करी (प्रतिबंध) कायदा आणि पोस्को (POCSO)कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले.

    आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा आमचा निर्धार आहे. या सर्वांना अटक करण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व कारवाई करत आहोत, असे तपास अधिकारी डीएसपी के. सुप्रजा यांनी टीएनआयईला सांगितलं. कोविड-19 च्या नावाखाली इतकी भयंकर फसवणूक करण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, सर्वांनीच अशा परिस्थितीत जागरुक राहणं आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: Crime, Gang Rape, Rape, Rape case, Rape on minor, Sex racket