मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिकवणीच्या वादातून क्लासचालकानं केली हद्द पार; केबीनमध्ये घुसून शिक्षकासोबत धक्कादायक कृत्य

शिकवणीच्या वादातून क्लासचालकानं केली हद्द पार; केबीनमध्ये घुसून शिक्षकासोबत धक्कादायक कृत्य

Crime in Beed: बीडमध्ये कोचिंग क्लास वॉरमधून (Coaching class war) एका क्लासचालकाने दुसऱ्या क्लासचालकावर प्राणघातक हल्ला (Deadly attack on tuition teacher) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
बीड, 04 फेब्रुवारी: बीडमध्ये कोचिंग क्लास वॉरमधून (Coaching class war) एका क्लासचालकाने दुसऱ्या क्लासचालकावर प्राणघातक हल्ला (Deadly attack on tuition teacher) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी क्लाच चालकाने अन्य एकाच्या मदतीने थेट केबीनमध्ये शिरून धांगडधिंगा घातला आहे. यावेळी आरोपीनं चाकुने हल्ला केला असता फिर्यादी थोडक्यात बचावले आहेत. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी फिर्यादीच्या डोक्याला गावठी बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून याचा तपास केला जात आहे. पंकज तांबारे आणि श्रीनिवास तांबारे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी हर्षल भास्कर केकाण यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, बीड शहरातील पांगरी रोड परिसरात फिर्यादी केकाण यांचे शिकवणी क्लास आहेत. ते  अकरावी आणि बारावीचे गणित विषयाचे क्लास घेतात. याच इमारतीत तळमजल्यावर आरोपी पंकज तांबारे भौतिकशास्त्राचे क्लास घेतात. हेही वाचा-घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; भयंकर प्रकारानंतर पीडितेचं टोकाचं पाऊल दरम्यान, 20 जानेवारी रोजी आरोपी तांबारे हा फिर्यादी केकाण यांच्या घरी गेला होता. यावेळी त्यानं 'माझ्याकडे क्लाससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू दुसरीकडे क्लास लावा, असं का सांगतो? असा जबाब विचारला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हेही वाचा-पतीचं अफेअर शोधण्यासाठी पत्नी बनली 'जेम्स बाँड'; GPS ट्रॅकर वापरून फोडलंं बिंग या घटनेनंतर, गुरुवारी फिर्यादी केकाण आपल्या क्लासमधील केबीनमध्ये बसले होते. यावेळी आरोपी पंकज तांबारे आणि श्रीनिवास तांबारे क्लासमध्ये घुसले. त्यांनी केबीन आतून बंद करत केकाण यांना शिवीगाळ केली. यावेळी पंकज याने केकाण यांच्यावर चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातून केकाण थोडक्यात बचावले. यानंतर आरोपींनी स्वत: जवळील गावठी कट्टा काढून केकाण यांच्या कानशिलावर लगावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर केकाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Beed, Crime news

पुढील बातम्या