मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मसाज पार्लरच्या नावाखाली SEX रॅकेट! तरुणींना नशेचं इंजेक्शन देऊन सुरू होतं काळं कृत्य; 6 जणं अटकेत

मसाज पार्लरच्या नावाखाली SEX रॅकेट! तरुणींना नशेचं इंजेक्शन देऊन सुरू होतं काळं कृत्य; 6 जणं अटकेत

वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवून तरुणींची फसवणूक करत त्यांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. लखनऊमध्ये (Lucknow Sex Racket) असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे.

वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवून तरुणींची फसवणूक करत त्यांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. लखनऊमध्ये (Lucknow Sex Racket) असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे.

वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवून तरुणींची फसवणूक करत त्यांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. लखनऊमध्ये (Lucknow Sex Racket) असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे.

  लखनऊ, 04 फेब्रुवारी: वेगवेगळ्या प्रकारची अमिषं दाखवून तरुणींची फसवणूक करत त्यांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. लखनऊमध्ये (Lucknow Sex Racket) असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. मसाज पार्लरच्या (Massage parlor) नावाखाली तरुणींना ओलीस ठेवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

  राजधानी लखनऊ येथील पोलिसांनी गुरुवारी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला, यात मुलींना ओलीस ठेवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. तावडीतून निसटलेल्या एका तरूणीने पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी छापा टाकून सहा आरोपींना अटक केली आहे. तरुणीने पोलिसांना सांगितलं की, 'तिच्यासह इतर तरुणींना तेथे ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांना ड्रग्ज आणि अनेक प्रकारच्या नशेच्या गोळ्या दिल्या जात होत्या. सेक्स रॅकेट चालवणारे नशेची औषधं देऊन लक्झरी गाड्यांमधून या तरुणींना ग्राहकांकडे घेऊन जात होते. जर एखाद्या तरुणीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला नशेचं इंजेक्शन दिलं जात असे.' पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या तरुणींची चौकशी केली जात आहे.

  हे वाचा-शिकवणीच्या वादातून क्लासचालकानं केली हद्द पार; बंदूक घेऊन केबीनमध्ये शिरला अन्..

  एडीसीपी पूर्वी कासीम आब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बीबीडी पोलीस स्टेशन परिसरात राहणारी एक तरुणी पीकेजी मसाज पार्लरमध्ये काम करते. सहा महिन्यांपूर्वी पीकेजी मसाज पार्लरमधून नोकरीची ऑफर दिल्याचा फोन आल्याची तक्रार तरुणीने केली होती. नोकरीच्या शोधात ही तरुणी तिथे गेली असता, तिथं तिला ओलीस ठेवण्यात आलं. यानंतर या तरुणीला गोमती नगर विरामखंड -2 येथील एका घरात ओलीस ठेवण्यात आलं. या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवले जात होते. ही तरुणी येथून कशीतरी निसटली. यानंतर पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांच्या कार्यालयात पोहोचत या तरुणीने तक्रार केली. त्यानुसार, त्यांनी या रॅकेटचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा आणि गोमती नगरच्या एसीपी श्वेता श्रीवास्तव यांना निर्देश दिले. याप्रकरणी छापेमारी केली असता घटनास्थळावरून सहा तरुणांना पकडण्यात आले. अटक केलेल्या तरुणांमध्ये अनिल कुमार, उदय पटेल, पीके, छोटू, राजकुमार आणि हृतिक यांचा समावेश आहे. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने पार्लरमधून आठ तरुणींना ताब्यात घेतले असून, या सर्वांना गोमतीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बीबीडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तरुणींची चौकशी (Inquiry) सुरू आहे.'

  First published:
  top videos

   Tags: Sex racket