मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पैशांपुढे मैत्री हरली! नांदेडात तरुणाने जीवलग मित्राला दिला भयंकर मृत्यू, थरकाप उडवणारी घटना

पैशांपुढे मैत्री हरली! नांदेडात तरुणाने जीवलग मित्राला दिला भयंकर मृत्यू, थरकाप उडवणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने पैशांच्या वादातून आपल्या जीवलग मित्राचा जीव घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk
नांदेड, 04 फेब्रुवारी: नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने पैशांच्या वादातून (Dispute over money) आपल्या जीवलग मित्राचा जीव घेतला (Young man killed friend) आहे. आरोपी तरुणाने धारदार चाकुने पोटात आणि छातीत वार (Attack with knife) करत मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की काही वेळातच तरुणाची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शहाजी जाधव असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर ज्ञानेश्वर जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी आणि मृत हे दोघंही एकमेकांचे जीवलग मित्र असून नातेवाईक आहेत. दोघंही मुखेड तालुक्यातील होनवडज गावातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शहाजी आणि आरोपी ज्ञानेश्वर दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. दरम्यान दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता. हेही वाचा-मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा घटनेच्या दिवशी (गुरुवारी) आरोपी ज्ञानेश्वर यानं आपला मित्र शहाजी याच्याकडे पैशांची मागणी केली होती. 'माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, काकाला येऊ दे, तुझे पैसे देतो' असं शहाजीनं ज्ञानेश्वरला सांगितलं. पण या उत्तरामुळे ज्ञानेश्वरला संताप अनावर झाला. आरोपीनं रागाच्या भरात शहाजीवर धारदार चाकुने हल्ला केला. त्याच्या पोटात आणि छातीत सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की शहाजी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हेही वाचा-पतीचं अफेअर शोधण्यासाठी पत्नी बनली 'जेम्स बाँड'; GPS ट्रॅकर वापरून फोडलंं बिंग या जीवघेण्या हल्ल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने शहाजीला मुखेड येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, त्याला नांदेड येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहाजीला मृत घोषित केलं. काही रुपयांच्या वादातून जीवलग मित्राचा जीव घेतल्याची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी ज्ञानेश्वर याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
First published:

Tags: Crime news, Murder, Nanded

पुढील बातम्या