Home /News /crime /

Nagpur Murder : नागपूर हादरलं! दारुड्या बापाने केला 10 वर्षाच्या मुलाचा खून, कारण ऐकून तुम्हीही हादराल

Nagpur Murder : नागपूर हादरलं! दारुड्या बापाने केला 10 वर्षाच्या मुलाचा खून, कारण ऐकून तुम्हीही हादराल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुलशन असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने पाणी भरून ठेवले नाही म्हणून नराधम संतालाल मडावीने आधी मुलाला जबर मारहाण केली.

  नागपूर, 24 मे : नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ (Crime News in Maharashtra) होताना दिसत आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या घटनाही घडत असल्याचे तुम्ही वाचले असेल. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरच्या सुरादेवी (Suradevi Nagpur) येथे ही घटना घडली आहे. काय आहे घटना - एका बापाने आपल्या पोटच्या मुलाची हत्या (Son Murder by Father) केल्याचे समोर आले आहे. पिण्याचे पाणी भरून ठेवले नाही म्हणून दारुड्या बापाने आपला 10 वर्षाच्या मुलाची हत्या केली. संतलाल मडावी, असे नराधम बापाचे नाव आहे. दारुची नशा उतरल्यानंतर नराधम बाप संतालाल मडावी याने हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील सुरादेवी येथे घडली आहे. हेही वाचा - प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक प्रकार
  12 वर्षाची मुलगी घरात आली अन् - 
  गुलशन असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने पाणी भरून ठेवले नाही म्हणून नराधम संतालाल मडावीने आधी मुलाला जबर मारहाण केली. त्यानंतर पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर मृतदेह घरात सोडून बाहेर निघून गेला. त्याची 12 वर्षाची मुलगी आली. तेव्हा तिला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तपासात या हत्याकांडाचा उलघडा झाला. आईने रागवलं अन् दुसऱ्या दिवशी सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा आढळला विहिरीत मृतदेह -

  दापोली (Dapoli) तालुक्यातील आंबवली गावातील इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत (Suicide of 13 year old girl) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नियशी राऊत असं मृत मुलीचे नाव आहे. खेकडे पकडायला नेण्यावरून तिला ओरडण्याचा राग मनात धरून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई नंदिनी राऊत यांनी दिली आहे आहे. दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. परंतु तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Murder, Nagpur News

  पुढील बातम्या