Home /News /crime /

प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक प्रकार

प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुंबईत प्रियकर आणि प्रेयसी संभोग (Physical Relation) करताना एका व्यक्तीचा मृत्यू (Death During Physical Relation) झाला आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला (Kurla Crime News) परिसरात घडली.

    मुंबई, 24 मे : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकर-प्रेयसीचे प्रेमसंबंध (Relationship) जुळल्यानंतर ते पळून गेल्याचे तुम्ही वाचले असेल. त्यातील अनेकांचं प्रेम (Love) यशस्वी झालं तर काही प्रेम हे यशस्वी झालं नसल्याचंही तुम्ही वाचले असेल. मात्र, प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच संभोग (Physical Relation) करताना त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली, जिचा तुम्ही विचारही केला नसेल. मुंबईतून प्रियकर आणि प्रेयसीसोबत घडलेला खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईत प्रियकर आणि प्रेयसी संभोग (Physical Relation) करताना एका व्यक्तीचा मृत्यू (Death During Physical Relation) झाला आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला (Kurla Crime News) परिसरात घडली. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा ते करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा वार आढळून आलेले नाहीत. मृताचे वय हे 61 तर त्याच्या प्रेयसीचे वय हे 40 आहे. काय आहे नेमकी घटना - मुंबईतील कुर्ला येथे एलबीएस रस्त्यावर जीएसके नावाचे हॉटेल (GSK Hotel Kurla) आहे. याठिकाणी एकाने आपल्या प्रेयसीसोबत (Girlfriend) सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध  (Physical Relation) ठेवले. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोगाच्या अवस्थेतच तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याची प्रेयसी ही अत्यंत घाबरुन गेली. तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात आणलं गेलं. मात्र, इथं आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा - BA च्या विद्यार्थ्याच 12 वीतील तरुणीसोबत लग्न; सकाळी भयंकर अवस्थेत सापडला पतीचा मृतदेह
    वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा -
    या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तसेच या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे का, हादेखील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी सध्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे. हॉटेलमध्ये येताना त्यांनी कोणते आयडी प्रुफ दाखवले होते, तेदेखील पोलीस तपासत आहेत. वैद्यकीय अहवालानंतर या मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, संभोग करताना मृत्यू झाल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Mumbai

    पुढील बातम्या