हरीष दिमोटे,अहमदनगर : किरकोळ वाद कधी कुठे कसं रुपांतर घेईल याचा काही नेम नाही. नगरमध्ये असाच भयंकर प्रकार समोर आला. किरकोळ वादातून चक्क मॅनेजरचीच हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आला आहे. अज्ञात तरुण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी मॅनेजरने मध्यस्ती केली. मात्र वादाचं रुपांतर हणामारी आणि त्यानंतर संतापलेल्या अज्ञातांनी मॅनेजरचीच हत्या केली. कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने मॅनेजरची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या पेट्रोलपंपावर घडल्याची माहिती मिळाली आहे. मॅनेजरवर संतापलेल्या अज्ञाताने धारदार चाकूने सपासप वार केले.
Mob Lynching : व्हॅनमध्ये हाडं घेऊन जात होता व्यक्ती, जमावानं विचारपूस केली अन् घडलं भयानक कांडकिरकोळ वादातून पेट्रोलपंप मॅनेजरची धारदार शस्त्राने वार करून हत्या...#nagar #crimenews #cctv #video #murder #marathinews pic.twitter.com/5ZMkuQ0wgv
— News18Lokmat (@News18lokmat) June 30, 2023
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील गुरुराज एचपी पेट्रोलपंप येथे ही घडली. या चाकू हल्ल्यात मॅनेजरचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंपाजवळील हॉटेलवरील एक कर्मचारीही आरोपींनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला.
Pune Koyta gang : पुण्यात कोयता गँगचा उच्छाद! पोलिसांनी असा मोडला माज, पाहा PHOTOघटनेनंतर तिघेही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले असून सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. भोजराज बाबुराव घनघाव वय 40 वर्ष या मॅनेजरचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हत्येनंतर तीन अज्ञात मारेकरी फरार असून, पोलिसांकडून CCTV व्हिडीओच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे.