पुणे शहरातील सहकारनगर भागात गाड्यांची तोडफोड करणारा कोयता टोळी प्रमुखांची पोलिसांनी आज धिंड काढली.
पुण्यातील अरणेश्वर भागात दोन दिवसांपुर्वी कोयता टोळीच्या दोन गटाने 15 गाड्यांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी आरोपींची सहकारनगर पोलिसांनी धिंड काढली.
आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ लक्ष्मण उमाप आणि त्याच्या 11 साथीदारांनी पुण्यातील सहकार नगर परिसरात असलेल्या आरणेश्वरमध्ये तोडफोड केली होती.
सहकार नगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर वाहनांच्या तोडफोडीत झाले होते. शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
कोयता टोळी प्रमुख जठाळ्याची धिंड काढल्याने परिसरात नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.