जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Mob Lynching : व्हॅनमध्ये हाडं घेऊन जात होता व्यक्ती, जमावानं विचारपूस केली अन् घडलं भयानक कांड

Mob Lynching : व्हॅनमध्ये हाडं घेऊन जात होता व्यक्ती, जमावानं विचारपूस केली अन् घडलं भयानक कांड

घटनास्थळावरील दृश्य

घटनास्थळावरील दृश्य

एका व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडली.

  • -MIN READ Local18 Saran,Bihar
  • Last Updated :

संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा, 30 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील जलालपूर पोलीस स्टेशन परिसरात मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती पिकअप वाहनात हाडे भरून कारखान्याकडे जात होता. त्यामुळे जलालपूरजवळ लोकांनी पिकअप वाहनाच्या चालकाला पकडले आणि चौकशी केल्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर या वाहनातील एकाने याठिकाणाहून पळ काढत आपला जीव वाचवला.

News18लोकमत
News18लोकमत

झाहरुद्दीन मियाँ (55) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मझवलिया गावातील रहिवासी होता. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला असून आतापर्यंत मॉब लिंचिंग प्रकरणी 20 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी सुरू आहे. जहरुद्दीन मियाँ हा ताजपूर बसही येथून नागरा येथील हड्डी डस्ट कारखान्यासाठी पिकअप व्हॅनमधून हाडे घेऊन जात होता. यावेळी ही घटना घडली. पिकअप व्हॅन जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोरी पाकडजवळील बतराहा मार्केटमध्ये आली असता त्यात काही बिघाड झाला. जहरुद्दीनने आपले वाहन थांबवून ते दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी काही लोक आले आणि त्यांनी वाहनात काय भरले, अशी विचारपूस सुरू केली. पण ट्रकमध्ये जनावरांची हाडे भरल्याचे समजताच या लोकांनी चालक जहरुद्दीनला पकडून बेदम मारहाण केली. जहरुद्दीनच्या पायाला स्टीलचा रॉड होता, त्यामुळे त्याला पळून जाता आले नाही आणि या मॉब लिंचिंगच्या घटनेत चालक झहरुद्दीन मियाँ याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एसडीएम संजय राय आणि डीएसपी घटनास्थळी पोहोचले होते. आतापर्यंत याप्रकरणी 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात