Home /News /crime /

'आमच्या आत्महत्येला आम्हीच जबाबदार', कुटुंबाची सुसाईड नोट वाचून पोलीसही चक्रावले; गूढ वाढलं

'आमच्या आत्महत्येला आम्हीच जबाबदार', कुटुंबाची सुसाईड नोट वाचून पोलीसही चक्रावले; गूढ वाढलं

आग्राच्या (Agra) बंशी विहार कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  लखनऊ, 3 डिसेंबर : देशासह जगावर कोरोनाचं (Corona) संकट आहे. या संकट काळात अनेकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. कुणाला नोकरी गमवावी लागली तर कुणाचा व्यवसाय ठप्प झाला. या संकटात झालेलं नुकसान काही लोकांना झेपलं नाही. त्यांना त्याचा त्रास झाला. त्यातून ते नैराश्यात (Depression) गेले. त्याच नैराश्यात त्यांनी आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचललं. खरंतर आयुष्यातील कुठल्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. पण काहींनी नैराश्यात जावून तसा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या (UP) आग्रा (Agra) शहरातूनदेखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटनेत फक्त एका व्यक्तीने आत्महत्या केलेली नाही. तर चार जणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील मोठ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

  आत्महत्येमागे नेमकं कारण काय?

  उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आग्राच्या बंशी विहार कॉलनीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तसेच या दाम्पत्याच्या लहान मुलीचादेखील मृत्यू झाला आहे. तर मोठ्या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कुटुंबाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे पोलिसांना मृतक व्यक्तीच्या कार्यालयात त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटदेखील मिळालीय. पण त्यात फारसं काहीच लिहिलेलं नाही. या सगळ्या घटनेला आम्हीच जबाबदार आहोत, असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे या मृत्यूमागील गूढ आणखी वाढलं आहे. हेही वाचा : हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत अनेक फायदे, वाचाल तर खातच रहाल

  घटना उघड कशी झाली?

  संबंधित घटनेतील कुटुंबप्रमुखाचं विशाल मिश्रा असं नाव आहे. ते ऑनलाईन बॅटरीचा व्यवसाय करायचे. ते इतक्या टोकाचं पाऊल उचलतील अशी कुणालाही कल्पना नव्हती. पण आज सकाळी त्यांच्या कार्यालयात एक कर्मचारी नियमित कामासाठी दाखल झाला तेव्हा त्यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तसेच त्याच ऑफिसमध्ये त्यांच्या पत्नी प्रचिती यांचा जमिनीवर मृतदेह पडलेला आढळला. हे सगळं दृश्य पाहून कर्मचारी घाबरला. त्याने तातडीने सिंकदरा पोलिसांना माहिती दिली. हेही वाचा : पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी अडवली कंगना रणौतची कार; केली माफी मागण्याची

  पोलिसांकडून तपास सुरु

  संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्यांना ऑफिसमध्ये एक सुसाईड नोट सापडली. त्यांनी ती सुसाईड नोट वाचली. पण त्यात फार काही माहितीच नव्हती. आमच्या आत्महत्येमागे आम्हीच जबाबदार आहोत, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांना संशय आला. ते तातडीने त्यांच्या बंशी विहार कॉलनीत त्यांच्या घरी तपासासाठी गेले. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांना पुन्हा एक धक्का बसला. कारण घरात मिश्रा दाम्पत्याच्या दोन्ही मुली निपचित पडल्या होत्या. हा देखील तसाच काहीसा प्रकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तातडीने दोन्ही मुलींना जवळील रुग्णालयात नेलं. पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी लहान मुलगी काव्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. तर मोठ्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिश्रा कुटुंबाच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलीस, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करत आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या