मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Shingada: हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत अनेक फायदे

Shingada: हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत अनेक फायदे

Shingada: हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत अनेक फायदे (Photo: shutterstock.com)

Shingada: हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे आहेत अनेक फायदे (Photo: shutterstock.com)

Shingada benefits: शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला फ्री रॅडिकल्ससारख्या हानिकारक मॉलिक्युलपासून वाचवतात.

    नवी दिल्ली, 3 डिसेंबर : शिंगाडा (Water chestnut) हे असं फळ (fruit) आहे, जे हिवाळ्यात (winter season) खूप आवडीने खाल्लं जातं. हे फळ खाण्यास चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (beneficial for health) आहे. हे फळ कच्चं किंवा उकडून खाल्लं जातं. हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारांपासून (serious diseases) वाचवते.

    वेबएमडीच्या वृत्तानुसार, शिंगाडा खाल्ल्याने वजन कमी करण्यास (reduce weight) मदत होते. तसंच, ते रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात ठेवतं, ज्यामुळे हृदय निरोगी ( heart healthy) राहण्यास मदत होते. हिवाळ्यात शिंगाडा खाण्याचे काय फायदे असतात, हे पाहू या.

    कमी कॅलरीज आणि भरपूर पोषक

    शिंगाडा फळ शरीरासाठी भरपूर पोषक असतं. तसंच त्यात खूप कमी कॅलरीज असतात. त्यात प्रथिनं, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि रायबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असतं. यामध्ये असलेले फायबर्स पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. या फळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे कॅलरीज कमी असतात. पोटाच्या विविध समस्या दूर होण्यास या फळाचे सेवन फायदेशीर ठरतं.

    वाचा : हेल्दी असलेलं नारळ पाणीही ठरू शकतं हानिकारक; याचे गंभीर दुष्परिणाम माहिती आहेत का?

    अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त

    शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला फ्री रॅडिकल्ससारख्या हानिकारक मॉलिक्युलपासून वाचवतात. फ्री रॅडिकल्स शरीरात जमा झाल्यास शरीर नैसर्गिकरीत्या सुरक्षित राहत नाही आणि यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो. त्यामुळे जुनाट आजार, हृदयविकार, टाइप टू मधुमेह आणि विविध प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. शिंगाड्यामध्ये प्रामुख्याने फेरुलिक अॅसिड, गॅलोकेटचिन गॅलेट, एपिकेटचिन गॅलेट आणि कॅटेचिन गॅलेट अशी विविध अँटीऑक्सिडंट्स असतात. ती शरीर निरोगी ठेवतात.

    हृदय निरोगी राहतं

    रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढल्याने स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. शिंगाड्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असून ते खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसंच पोटॅशियम हृदयविकाराचा धोका कमी करतं. शिंगाडा खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

    वाचा : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

    वजन कमी करण्यास मदत

    वजन कमी करण्यासाठी शिंगाडा खूप प्रभावी आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी हे फळ खाणं फायद्याचं ठरते. शिंगाडा खाल्ल्याने खूप वेळ भूक लागत नाही. तुम्हाला खूप वेळा भूक लागत असेल, तर कार्बोहायड्रेट्स जास्त असलेल्या पदार्थांऐवजी शिंगाडा खा. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं.

    तणाव कमी होतो

    शिंगाडा खाल्याने तणाव दूर होतो आणि शरीरातला थकवाही दूर होतो. तुम्हाला अशक्तपणा आल्यासारखं वाटत असेल आणि शरीर थकल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही शिंगाड्याचं सेवन करा. यामुळे तणाव कमी होण्यासदेखील मदत होते.

    First published:

    Tags: Health, Health Tips